Home /News /videsh /

शरीरापासून ते डोळ्यांपर्यंत...शिक्षकाने स्वत:ला केलं भीतीदायक; आता शिकवण्यावरच आली बंदी

शरीरापासून ते डोळ्यांपर्यंत...शिक्षकाने स्वत:ला केलं भीतीदायक; आता शिकवण्यावरच आली बंदी

शिक्षकाचं ते रूप पाहून विद्यार्थी पुरते घाबरले आहेत.

    नवी दिल्ली, 21 एप्रिल : टॅटूप्रेमींचे एकाहून एक किस्से ऐकायला आणि पाहायला मिळतात. टॅटू काढणं यात काही चूक नाही, मात्र जे लोक याचा अतिरेक करतात, त्यांना याचे परिणामही भोगावे लागतात. वेगळं दिसण्याच्या नादात लोक स्वत:वरच इतका अत्याचार करतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. एका शिक्षकानेही आपल्या टॅटूविषयी असलेल्या प्रेमातून असं काही केलं की त्याला आपल्या कामातून बाहेर काढण्यात आलं. व्यवसायाने शिक्षक असलेला सोल्वेन हेलन गेल्या 10 वर्षांपासून मुलांना शिकवतो. मात्र जेव्हा त्याने संपूर्ण अंगभर टॅटू काढले तर तो विचित्र प्राण्यासारखा दिसू लागला. यानंतरही त्याने अनेक शाळांमध्ये शिकवलं. मात्र शरीरभर टॅटू काढल्यानंतरही त्याचं मन भरलं नाही आणि त्याने असं काही केलं की, त्याला पाहून मुलंही घाबरू लागली. त्यामुळे या शिक्षकावर बंदी घालण्यात आली. हे ही वाचा-सायकलस्वाराच्या जवळून जाणं Land Rover मालकाला पडलं महागात, भरावा लागला 99 हजारांचा दंड प्राथमिक शाळेच्या शिक्षकाच्या शरीरावरील टॅटू पाहून आणली बंदी... संपूर्ण शरीरभर टॅटू काढल्यानंतरही लंडन आणि उत्तर फ्रान्समध्ये 10 वर्षांहून अधिक काळ तो शिक्षक म्हणून काम करीत होता. त्याच्या संपूर्ण शरीरभर टॅटू काढण्यात आले आहेत. इतकच नाही तर सिल्वेनने आपला चेहरा, जीभ आणि शरीरभर टॅटू काढले आहेत. याशिवाय त्याने आपल्या डोळ्यातील पांढऱ्या बुबुळावर इंजेक्शन लावून त्याचा रंगाही काळा केला आहे. सोल्वेनने सांगितलं की, हे धोकादायक प्रयोग करण्यासाठी तो स्वित्झलँडला गेला होता. येथे डोळ्यांना मॉडिफाय करताना त्याला काही अंशी अंधत्व आलं. शरीरासह डोळ्यातही रंग भरला, मुलं घाबरली... हे सर्व इतकं सोपं नव्हतं. डोळ्यात टॅटू करणं अत्यंत धोकादायक असतं. अनेकजणं या वेडापायी डोळे गमावून बसले आहेत. त्यामुळे सोल्वेनने लोकांना असं न करण्याची विनंती केली आहे. हा शिक्षक आता नर्सरीच्या मुलांना शिकवू शकत नाही. कारण तीन वर्षांपर्यंतची मुलं शिक्षकाचं हे रूप पाहून खूप घाबरतात. त्यामुळे हा शिक्षक आता 6 वर्षांहून मोठ्या मुलांनाच शिकवू शकतो.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Education, School teacher

    पुढील बातम्या