मराठी बातम्या /बातम्या /विदेश /इडली, बूट, भाषण आणि 'वोग', जेव्हा कमला हॅरिस भारतीय हेडलाईनमध्ये झळकल्या

इडली, बूट, भाषण आणि 'वोग', जेव्हा कमला हॅरिस भारतीय हेडलाईनमध्ये झळकल्या

20 जानेवारी 2021 ला इनॉग्रेशन डे सेरेमनी म्हणजे शपथविधीच्या दिवशी जो बायडन (Joe Biden) यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मूळच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक कमलादेवी हॅरिस (Kamala Harris) यांनी अमेरिकेच्या 49 व्या उपाध्यक्षा म्हणून शपथ घेतली.

20 जानेवारी 2021 ला इनॉग्रेशन डे सेरेमनी म्हणजे शपथविधीच्या दिवशी जो बायडन (Joe Biden) यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मूळच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक कमलादेवी हॅरिस (Kamala Harris) यांनी अमेरिकेच्या 49 व्या उपाध्यक्षा म्हणून शपथ घेतली.

20 जानेवारी 2021 ला इनॉग्रेशन डे सेरेमनी म्हणजे शपथविधीच्या दिवशी जो बायडन (Joe Biden) यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मूळच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक कमलादेवी हॅरिस (Kamala Harris) यांनी अमेरिकेच्या 49 व्या उपाध्यक्षा म्हणून शपथ घेतली.

पुढे वाचा ...

  वॉशिंग्टन, 21 जानेवारी : जगातील सर्वांत मोठी आर्थिक महासत्ता अमेरिका. तिच्या अध्यक्षपदी कोण बसणार याची उत्सुकता जगाला होती. निवडणुकीनंतर ते नाव निश्चित झालं आणि 20 जानेवारी 2021 ला इनॉग्रेशन डे सेरेमनी म्हणजे शपथविधीच्या दिवशी जो बायडन (Joe Biden) यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मूळच्या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक कमलादेवी हॅरिस (Kamala Harris) यांनी अमेरिकेच्या 49 व्या उपाध्यक्षा म्हणून शपथ घेतली. अमेरिकी लोकशाहीच्या 200 हून अधिक वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा महिला उपाध्यक्षपद भूषणवण्याचा मान कमला हॅरिस यांना मिळाला आहे.

  अनेकदा मिळवला पहिल्याचा मान

  पहिल्यांदाच सिनेटर म्हणून निवडून आलेल्या कमला यांनी पहिल्या कृष्णवर्णीय भारतीय-अमेरिकी वंशाच्या उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवून एक इतिहास रचला आहे. 56 वर्षांच्या हॅरिस या सिनेटमध्ये असलेल्या केवळ तीन आशियाई-अमेरिकी सदस्यांपैकी एक आहेत. चेंबरमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकी नागरिक आहेत. सॅनफ्रान्सिस्कोच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकी-भारतीय-अमेरिकी वंशाच्या काउंटी डिस्ट्रिक्ट अटर्नी आणि डिस्ट्रिक्ट अटर्नी होण्याचा मान त्यांनी पटकावला होता.

  कमला यांचे आवडते भारतीय पदार्थ

  गेल्या काही महिन्यांपासून कमला हॅरिस इंटरनेटवर खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत. अमेरिकी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, कारकीर्दीबद्दल अनेक गोष्टी नेटवर व्हायरल झाल्या. हॅरिस यांची आई मूळची भारतातील असल्याने भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतो. त्यामुळे त्यांच्या भारताशी असलेला संबंध आवडी-निवडी यांचीही माहिती नेटवर प्रसिद्ध झाली. नोव्हेंबर 2020 मध्ये निवडणुकीवेळी हॅरिस यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की, कुठल्याही पद्धतीचा टिक्का आणि इडली उत्तम सांबारासोबत खायला मला आवडते. त्यामुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

  कमला यांचे आरामदायक शूज

  2020 मधील निवडणूक प्रचारादरम्यान कमला यांनी उबर कूल कॉनव्हर्स शूज घातले होते. सामान्यपणे अमेरिकी महिला ज्याला प्राधान्य देतात त्या स्टिलेटोज म्हणजेच उंच टाचांच्या बुटांऐवजी आरामदायी बुटांची कमला यांनी केलेली निवडही बरीच गाजली. संपूर्ण राजकीय कारकीर्दीत त्यांनी हेच बूट वापरले आहेत, त्यामुळे त्यांच्या पेहरावाबाबत ही दखल सगळीकडे घेतली गेली.

  हॅरिस यांचं भाषण आणि सांकेतिक कपडे

  अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा म्हणून कमला यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तो सूट कॅरोलिना हेरा यांनी डिझाइन केला होता. तो सूट परिधान केल्यावर कमला केवळ सुंदरच दिसत नव्हत्या तर त्यातून त्यांनी अमेरिकी नागरिकांना संदेश दिला. महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी सुरू केलेल्या सफरगेट चळवळीतील (suffragette movement ) महिलांना दिलेली ती आदरांजली होती. भाषणात कमला म्हणाल्या, ‘ तिची (माझ्या आईची पिढी) आणि कृष्णवर्णीय महिला, आशियाई, गोऱ्या, लॅटिना, नेटिव्ह अमेरिकेतील महिलांच्या ज्या पिढ्यांनी या चळवळीत योगदान दिलं त्या सर्वांना मी आदरांजली वाहते. ज्यांच्यामुळेच आज अमेरिकेच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याचा माझा मार्ग प्रशस्त झाला.’

  वॉकआउट साँग

  उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कमला यांनी वॉकआउट साँग निवडलं. मेरी जे ब्लिग यांचं ‘वर्क दॅट’ हे ते गाणं होतं. अमेरिकेतील मोठ्या पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात जेव्हा हॅरिस यांचं नाव जाहीर झालं होतं तेव्हा या ऐतिहासिक निवडीनंतरही त्यांनी हेच वॉकआउट साँग निवडलं होतं. अशी निवड होणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत्या. तुझ्या त्वचेच्या रंगावरून जरी कुणी तुला हिणवलं तरीही तू तुझी उच्च मानसिकता तशीच राख आणि पुढे चाल अशा अर्थाचे या गाण्याचे बोल आहेत.

  नावात काय आहे? सगळंच

  गेल्या महिन्यात अमेरिकेतील कॅप्शनिंग कंपनीनी सर्वांत चुकीचा उच्चार केले गेलेले शब्द प्रसिद्ध केले होते आणि त्यात कमला हॅरिस हे नाव होतं. कमला हे भारतीय नाव असल्याने ते अमेरिकी लोकां उच्चारायला अवघड जातं. ते हॅरिस पटकन म्हणतात पण कमला उच्चारू शकत नाहीत. यूएस कॅप्शनिंग कंपनीच्या म्हणण्यानुसार अमेरिकन त्यांच्या नावाचा उच्चार ‘काह-माह-लाह’ असा करतात.

  हॅरिस पती-पत्नींनी मोडली परंपरा

  कमला आणि त्यांचे वकील पती डग्लस इमॉफ यांनी कायमच पारंपारिक गोष्टींना फाटा दिला आहे. अमेरिकेचे सेकंड जंटलमन झालेल्या डग्लस यांना नुकतंच सेकंड जंटलमन असं ट्विटर हँडल देण्यात आलं. त्यानंतर सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या नात्याबद्दल सांगितलं. राजकारणात सामान्यपणे पारंपरिक पद्धतीने जोडीदाराला जाहीर पाठिंबा देण्याचं टाळलं जातं पण आम्ही सुरूवातीपासून परस्परांच्या राजकीय भूमिकांना जाहीर पाठिंबा दिला आहे, असं त्यांनी सांगितलं. इमॉफ यांनी 2013 मध्ये कमला हॅरिस यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्या दोघांच्या मित्राकडे त्यांची भेट झाली होती.

  द व्होगचा वाद

  काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील प्रसिद्ध फॅशन मॅगझिन व्होगने आपल्या मुखपृष्ठावर कमला हॅरिस यांचा फोटो छापला होता आणि त्यात त्यांच्या त्वचेचा रंग थोडासा काळसर छापला होता. त्यावरून वाद झाला. या गोष्टीला विरोध झाल्यानंतर व्होग मासिकाने हॅरिस यांचा फोटो असलेला अंक फेब्रुवारी महिन्यात मर्यादित स्वरूपात प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

  First published:
  top videos