कोरोनाला रोखण्यासाठी भयावह उपाय; रुग्णांना दिलं जातंय 'या' प्राण्याचे मांस

कोरोनाला रोखण्यासाठी भयावह उपाय; रुग्णांना दिलं जातंय 'या' प्राण्याचे मांस

यावर अनेक तज्ज्ञांनी आक्षेप नोंदविला आहे

  • Share this:

वुहान, 8 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अत्यंत जलद गतीने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे मृतांची संख्या 722 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत 34,546 लोक या व्हायरसमुळे संक्रमित झाल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान कोरोना या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी वुहानमध्ये रुग्णांना जेवणात कासवाचे मांस दिले जात आहे. वुहानच्या रुग्णालयात या निर्णयावर विशेषज्ज्ञ शंका उपस्थित करीत आहेत. वटवाघुळाचे सूप प्यायल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण माणसांमध्ये झाल्याची चर्चा असल्याने कासवाचे मांस खाण्यावर आक्षेप नोंदविला जात आहे.

रात्रीच्या जेवणात कासवाचे मांस

डेलीमेलच्या अहवालानुसार हुबेई प्रांतची राजधानी वुहानमधील रुग्णालयात वेगवेगळे ठेवण्यात आलेल्या रुग्णांना रात्रीच्या जेवणात कासवाचे मांस दिले जात आहे. चीनच्या मीडियाने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने दावा केला आहे की, चीनच्या परंपरागत चिकित्सेनुसार कासवाचे मांस पोषक तत्वांनी भरपूर मानले जाते.

कासवाच्या मांसात मुबलक प्रथिनं

चीनच्या लोकांचा विश्वास आहे की, त्यांच्या देशात मिळणारा कासव प्रथिनांनीयुक्त आहे. यामुळे आजारी लोक लवकर बरे होतात. या कासवांना जंगलातील प्रजनन केंद्रातून आणले जाते आणि सूप बनवून पाण्यात घातले जाते. चीनच्या मीडियाच्या कासवासाचे सूप करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोरोना व्हायरस रोखण्यासाठी तयार केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात चित्रीत केला आहे.

चीनच्या वैज्ञानिकांचा आक्षेप

या व्हिडिओमध्ये एक रुग्ण सांगतो की, आमच्या अन्नात कासवाचे नरम मांस दिले जात आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरस वटवाघुळ वा साप खाल्ल्याने पसरला नाही. खरं तर पॅंगोलिन (मोठी पाल) यामुळे कोरोना व्हायरस पसरला आहे. दक्षिण चीन शेती विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की पॅंगोलिनमुळे माणसांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. तब्बल 1 हजार जंगली प्राण्यांच्या नमून्याच्या तपासणीनंतर चीनच्या शोधकर्त्यांनी हा दावा केला आहे की, जीनोम सिक्वेंसच्या आधारावर पाहिलं तर कोरोना व्हायरस पॅंगोलिनमध्ये 99 टक्के आढळून आला आहे. चीनमध्ये काल शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे 86 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 81 लोकांचा मृत्यू हुबेई प्रांत आणि त्यांची प्रांतिय राजधानी वुहान येथे झाला आहे.

अन्य बातम्या

VIDEO : आक्षेपार्ह विधानावर अलका लांबा भडकली, 'आप'च्या कार्यकर्त्यावर उचलला हात

SHIKARA : ...आणि 92 वर्षीय आडवाणींच्या डोळ्यात आलं पाणी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2020 03:31 PM IST

ताज्या बातम्या