Home /News /videsh /

‘आता जगण्याची इच्छा नाही,’ आजारी रुग्णाने Facebookवर केलं मृत्यूचं Live Streaming

‘आता जगण्याची इच्छा नाही,’ आजारी रुग्णाने Facebookवर केलं मृत्यूचं Live Streaming

मला जिवंतपणी मरणयातना नको आहेत. आता जगण्याची इच्छा नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

    पॅरीस 4 सप्टेंबर:  सर्व जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत फ्रान्समध्ये एका घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. दुर्धर आजाराला कंटाळलेल्या एका रुग्णाने आपल्या मृत्यूचं Facebookवर Live Streaming सुरु केल्याने देशभर खळबळ उडाली आहे. या रुग्णाने आजाराला कंटाळून इच्छामरणाची परवानगी मागतिली होती. मात्र ती फेटाळण्यात आल्याने त्याने अन्न-पाण्याचा त्याग करत मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं लाईव्ह सुरु केलं त्यामुळे इच्छा मरणाचा प्रश्नाची जगभर चर्चा होतेय. 57 वर्षांचे कोक हे असाध्य आजाराने ग्रस्त आहेत. गेली अनेक वर्ष उपचार सुरू असल्याने ते त्या उपचारांना कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छा मरणाची परवानगी मागितली. मला एखादं औषध देऊन शांतपणे मरण द्या अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र कायद्यातच तशी तरतूद नसल्याने आम्हाला निर्णय घेता येत नाही असं सरकारने त्यांना कळवलं होतं. त्यामुळे ते चांगलेच नाराज झाले. मला जिवंतपणी मरणयातना नको आहेत. आता जगण्याची इच्छा नाही असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र फ्रान्सच्या कायद्यानुसार अशी परवानगी देता येत नसल्याचं अध्यांनी कोक यांना कळवलं होतं. त्यानंतर त्याचा निषेध म्हणून कोक यांनी अन्न-पाणी सोडून देत मृत्यूला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. एवढं नाही तर त्याचे सोशल मीडियावरून त्यांनी लाईव्ह सुद्धा सुरु केलं. त्यानंतर या प्रकरणाची देशभर चर्चा सुरु झाली आहे. इच्छामरणाच्या प्रश्नाची चर्चा व्हावी आणि त्यातून नवा कायदा जन्माला यावा यासाठीच हा प्रयत्न असल्यचं कोक यांनी म्हटलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Social media

    पुढील बातम्या