कोरोना लॉकडाऊनमध्ये वाया गेली दारू; आता वाचवणार लोकांचा जीव

कोरोना लॉकडाऊनमध्ये वाया गेली दारू; आता वाचवणार लोकांचा जीव

लॉकडाऊनमुळे विक्री न झालेल्या 20 कोटी लीटर वाइनचा (WINE) कोरोनापासून बचावासाठी वापर केला जाणार आहे.

  • Share this:

पॅरिस, 05 जून : कोरोनाव्हायरसविरोधात कोणतं औषध, लस येत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग हा बचावाचा एक मार्ग आहे. त्यामुळे जगातील कित्येक देशांनी लॉकडाऊन (lockdown) लागू केला. ज्यामुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंद्यांवर परिमाण झालं. त्यापैकीच एक म्हणजे मद्य व्यवसाय. लॉकडाऊनमुळे बार, रेस्टॉरंट्स बंद झाले. दुकानातील दारू विक्रीही बंद झाली आणि त्यामुळे कित्येक कोटी लीटर वाइन (wine) वाया गेली. आता हीच वाया गेलेली वाइन लोकांचा जीव वाचवणार आहे.

द गार्डियनच्या वृत्तानुसार फ्रान्ससह संपूर्ण युरोपमध्ये वाइनची विक्री न झाल्याने वाइन उत्पादित करणाऱ्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालं. आता वाइनचं नवं सिझन येतं आहे. म्हणजे नव्याने वाइन तयार होणार आहे. अशात लॉकडाऊनमध्ये उरलेला स्टॉक कसा ठेवायचा ही समस्या आहे. फक्त एकट्या फ्रान्समध्ये 30 कोटी लीटर वाइन वाया जाणार आहे.

हे वाचा - चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात मराठी माणसं आघाडीवर; Network18 चा सर्व्हे

मात्र आता या वाइनपासून इथेनॉल किंवा हँड जेल तयार केलं जाणार आहे. जे सॅनिटायझरच्या रुपात वापरलं जाईल. म्हणजे कोरोनाव्हायरसमुळे जी वाइन विकली गेली नाही, त्यापासून आता सॅनिटायझर तयार केलं जाणार आहे. अशा पद्धतीने ही वाया गेलेली वाइन वेगळ्या रूपात आता लोकांचा जीव वाचवणार आहे. लोकांचं कोरोनाव्हायरसपासून बचाव करणार आहे.

फ्रान्समधील 20 कोटी लीटर वाइन जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 10 कोटी वाइनचं काय केलं जाणार आहे, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र ही वाइनदेखील कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुन्हा वापरावी लागेल. जेणेकरून नव्या वाइनसाठी जागा होईल.

हे वाचा - कोरोना लॉकडाऊनमुळे झालं ब्रेकअप; पुन्हा पॅचअप करायचंय? मग तुमच्यासाठी टीप्स

वाइन उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशी परिस्थिती फक्त फ्रान्समध्येच नाही तर इटली आणि स्पेनसारख्या कित्येक देशांमध्ये आहे. त्यामुळे युरोपियन युनियन आणि या देशांनी या व्यापाऱ्यांची मदत करण्याची योजना तयार केली आहे. याअंतर्गत या व्यावसायिकांना 100 कोटी वाइनसाठी 78 युरो मदत दिली देणार आहे.

First published: June 5, 2020, 9:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या