फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची 'अनोखी लव्हस्टोरी', शाळेतल्या टिचरशी केलं लग्न

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची 'अनोखी लव्हस्टोरी', शाळेतल्या टिचरशी केलं लग्न

एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही अनोखी प्रेमकहाणी. इमॅन्युएल आणि ब्रिगेटी यांच्यामध्ये आहे 25 वर्षांचं अंतर.

  • Share this:

अजय कौटिकवार, मुंबई

08 मे :  असं म्हणतात प्रेमाला वयाचं बंधन नसतं... हेच म्हणण खरं करून दाखवलंय फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅकरॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिटा ट्रॉगनेक्‍स यांनी...

इमॅन्युएल मॅकरॉन फ्रान्सचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांचं राष्ट्राध्यक्ष होण्यासोबतच त्यांचं वैवाहिक जीवन देखील सध्या जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. त्याचं कारण ही तसंच आहे, कारण इमॅन्युएल मॅकरॉन यांच्या पत्नीपेक्षा 25 वर्षांनी लहान आहेत.

मॅकरॉन हे फक्त 39 वर्षांचे आहे, तर त्यांच्या पत्नी ब्रिगिटा ट्रॉगनेक्‍स या 64 वर्षांच्या आहेत. त्यामुळं त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा झाली नाही तरंच नवल. 2007 मध्ये जेव्हा त्यांचं लग्न झालं, तेव्हाही फ्रान्समधल्या सर्व माध्यमांनी या लग्नाची दखल घेतली होती.

इमॅन्युएल आणि ब्रिगेटी या दोघांतही 25 वर्षांचे अंतर आहे. मॅकरॉन शाळेत असताना  ब्रिगिटा या त्यांच्या ड्रामा टिचर होत्या. स्मार्ट मॅकरॉन यांची नाटकं, त्यावेळी शाळेत चांगलीच गाजली होती. कारण 15 वर्षांचे मॅकरॉन आपल्यापेक्षा 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ब्रिगिटा या तीन मुलांच्या आई होत्या. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही अनोखी प्रेमकहाणी शाळेतही चांगलीच गाजली होती.

फ्रान्समध्ये लग्नाचं वय 18 असल्यानं या दोघांना लग्न करणंही शक्य नव्हतं. तीन वर्षांच्या रोमांसनंतर ब्रिगिटांनी घटस्फोट दिला आणि मग या दोघांनी लग्न केलं. हे लग्न एवढं गाजलं की त्यावर 'इमॅन्युएल मॅकरॉन : ए परफेक्ट यंग मॅन' हे पुस्तकही आलं. मॅकरॉन राष्ट्रपती झाले तर ब्रिगिटा या फ्रान्सच्या फर्स्ट लेडी बनतील.

First published: May 8, 2017, 9:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading