रामराम पावणं! फ्रेंच राष्ट्रपतींनी जर्मन काउन्सिलरचं भारतीय पद्धतीनं केलं स्वागत, पाहा VIDEO

रामराम पावणं!  फ्रेंच राष्ट्रपतींनी जर्मन काउन्सिलरचं भारतीय पद्धतीनं केलं स्वागत, पाहा VIDEO

कोरोना काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक देशांच्या नेते आणि राष्ट्राध्यक्षांनी नमस्ते, नमस्कार ही संस्कृती अंगिकारली

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखून एकमेकांशी संवाद साधत आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांचं स्वागत भारतीय पद्धतीनं केल्याचं पाहायला मिळालं. इतरवेळी त्यांचं होणारं स्वागत आणि आज करण्यात आलेलं स्वागत यात खूप मोठा फरक होता. अर्थातच यामागे कोरोनाचं सावट हे एक कारण होतं.

भारतात पूर्वीपासून एकमेकांना लांबून हात दाखवून रामराम पावणं! म्हणत हालहवाल विचारण्याची पद्धत होती. याशिवाय शेकहँड ऐवजी नमस्काराला प्राधान्य दिलं जातं होतं मात्र गेल्या काही वर्षात शेकहँडनं ती जागा घेतली पण कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीनं स्वागत करणं आलं.

सोशल डिस्टन्सिंग राखून नमस्कार करून स्वागत केल्याचे फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या भेटीदरम्यान कोरोनामुळे शेकहँड आणि गळाभेटीऐवजी आता नमस्कार करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

कोरोना काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह अनेक देशांच्या नेते आणि राष्ट्राध्यक्षांनी नमस्ते, नमस्कार ही संस्कृती अंगिकारली असून त्याचा प्रचार करत आहेत. फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनेक युझर्सनी ही भारतीय पद्धत जगभरात कोरोना काळात वापरली जात असल्यानं कौतुकही केलं आहे. या भेटीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करण्यात आल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर अनेक आपली मतं नोंदवल्याचंही पाहायला मिळत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 21, 2020, 12:58 PM IST

ताज्या बातम्या