मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

LIVE VIDEO: थेट राष्ट्राध्यक्षांच्या कानाखाली वाजवली; दोघांना तत्क्षणी अटक

LIVE VIDEO: थेट राष्ट्राध्यक्षांच्या कानाखाली वाजवली; दोघांना तत्क्षणी अटक

President Emmanuel Macron slapped: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जनतेशी संवाद साधण्यासाठी (Walkabout) जात असतानाच गर्दीतल्या एकाने त्यांना थेट गालावर फटका मारला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने सावध होत दोघांना अटक केली आहे. पण या घटनेचा LIVE VIDEO समोर आल्याने खळबळ उडाली.

पुढे वाचा ...
  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

पॅरिस, 8 जून: देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीबद्दल नाराजी असणं, रोष असणं, त्यांच्याविरोधात आंदोलनं होणं वगैरे लोकशाही देशात नवं नाही, पण म्हणून थेट त्या सर्वोच्च नेत्याला भर रस्त्यात जनतेशी संवाद साधत असतानाच फटकवायचं, हे नवीन. फ्रान्समध्ये हे घडलं. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याच एकाने तोंडात मारली आणि त्याला तत्क्षणी अटकही झाली. पण या घटनेचा LIVE VIDEO समोर आला आणि VIRAL झाल्याने खळबळ उडाली आहे.

जनतेशी थेट संवाद साधायचा कार्यक्रम असेल तेव्हा त्याला वॉक अबाउट असं म्हणतात. अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या अशाच walk About दरम्यान हा विचित्र प्रसंग घडला. सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षांशी या व्यक्तीने हस्तांदोलन केलं आणि नंतर थेट हात उगारला. काही समजायच्या आत त्याने मॅक्रॉन यांना चेहऱ्यावर फटका मारला होता.

दक्षिण फ्रान्समधल्या ड्रोम प्रांतात ही घटना घडली. स्थानिक रेडिओ आणि टीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे आणि Twitter वर हा VIDEO VIRAL होत आहे. या हिरव्या टीशर्ट मधल्या व्यक्तीने "Down with Macronia" (“A Bas La Macronie") अशी घोषणा देत अध्यक्षांवर हात उगारल्याचं सांगण्यात येत आहे. या व्यक्तीने फेस मास्क लावलेला होता.

सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत धावपळ करत लोकांना दूर लोटून या फटका मारणाऱ्याला घेरलं. तो कोण होता हे अद्याप समोर आलेलं नाही. पण या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: France