Home /News /videsh /

अरे देवा! MASK च विसरले; भीतीने फ्रान्सच्या मंत्र्याने हातानेच झाकलं तोंड

अरे देवा! MASK च विसरले; भीतीने फ्रान्सच्या मंत्र्याने हातानेच झाकलं तोंड

मास्क हा परिणामकारक असला तरी अमेरिकन लोक मास्क घालण्याचे टाळत आहेत. कोरोनाची साथ रोखायची असेल तर मास्क घाला असं आवाहनही त्यांनी केलं.

मास्क हा परिणामकारक असला तरी अमेरिकन लोक मास्क घालण्याचे टाळत आहेत. कोरोनाची साथ रोखायची असेल तर मास्क घाला असं आवाहनही त्यांनी केलं.

फ्रान्समध्ये (france) सार्वजनिक ठिकाणी मास्क (mask) घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

    रोम 16 जुलै : फ्रान्समध्ये (france) घराबाहेर पडताना सार्वजनिक ठिकाणी मास्क (mask) घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अशात फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाला उपस्थित राहिलेली मंत्रीच (france minister) मास्क घालायला विसरली. त्यानंतर या मंत्र्यानं चक्क हातानेच तोंड झाकून घेतलं. मास्क मिळेपर्यंत मंत्री आपल्या तोंडावर हात ठेवून राहिल्या. फ्रान्सच्या उद्योगमंत्री एग्नेस पॅन्नियर रनर (Agnes Pannier-Runacher) 14 जुलैला पॅरिसमध्ये झालेल्या बॅस्टिल डे (Bastille Day) कार्यक्रमाला उपस्थित होत्या. फ्रान्सच्या या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात त्या प्लेस दे ला कॉनकॉर्डला आपल्या कारने पोहोचल्या. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना भेटणं सुरू केलं. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर त्यांनी मास्क असल्याचं पाहिलं आणि आपण मास्क घालायला विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे. आपण मास्क घातलं नाही हे लक्षात येताच त्या पॅनिक झाल्या, त्यांनी आपल्या तोंडावर हात ठेवला, हाताने तोंड झाकलं आणि आपल्या गाडीच्या दिशेनं धावू लागल्या. एग्नेस यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना इशाऱ्याने मास्कबाबत सांगितलं. तोपर्यंत त्या आपल्या तोंडावर हात ठेवून राहिल्या. काही वेळानं अधिकाऱ्याने त्यांना अतिरिक्त मास्क आणून दिला. हे वाचा - इंग्लंड, फ्रान्समध्येही आता mask बंधनकारक; नाहीतर होणार ही शिक्षा जगभरात 13,732,432 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 587,790 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर, ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. फ्रान्सचा अठरावा नंबर आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 173,304 कोरोना रुग्ण आहेत. 30,120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसने रिपोर्टनुसार यूकेमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लाट येणार आहे आणि ही लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. या रिपोर्टनंतर आता इंग्लंड आणि फ्रान्ससह स्पेन, इटली, जर्मनी यासारख्या युरोपियन देशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - कोरोना रुग्णाचं तब्बल दीड कोटी बिल माफ; रुग्णालयाने घडवलं माणुसकीचं दर्शन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असल्याची घोषणा केली होती. पुढील आठवड्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेदेखील कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्यावर भर दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या