...आणि ब्रिटनमधला फ्रेड लॅब्राडोर बनला बदकाच्या ९ पिल्लांचा पालक

तुम्ही निसर्गाचा चमत्कार पाहिला आहेत का ? मंडळी मातृत्वाची भावना फक्त जन्मदात्या आईमध्ये असते का, तर असं नाही आहे. कारण....

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 26, 2018 09:29 PM IST

...आणि ब्रिटनमधला फ्रेड लॅब्राडोर बनला बदकाच्या ९ पिल्लांचा पालक

26 मे : तुम्ही निसर्गाचा चमत्कार पाहिला आहेत का ? मंडळी मातृत्वाची भावना फक्त जन्मदात्या आईमध्ये असते का, तर असं नाही आहे. कारण ब्रिटनमध्ये एका लॅब्राडोर श्वानानं बदकाच्या ९ पिल्लांचं पालकत्व स्वीकारलं आहे. तुम्हाला हे जरा पटणार नाही, पण हे खरं आहे.

फ्रेड असं या श्वानाचं नाव आहे. ब्रिटनच्या स्टॅन्सेड विमानतळाजवळ तो राहतो. म्हणजे एका संस्थेनं त्याला पाळलंय. गुरुवारी ही ९ पिल्लं त्यांच्या आईविना जात असल्याचं फ्रेडनं पाहिलं. तो तातडीनं त्यांच्याकडे गेला, आणि तेव्हापासून तो त्यांची काळजी घेतोय.

स्वतःची झोपायची बास्केटही त्यानं या ९ चिमुकल्यांनाच दिली आहे. एकदा तर हा फ्रेड त्यांना पोहायलाही घेऊन गेला. म्हणजे ही ९ पिल्लं त्याच्या पाठीवर बसली आणि फ्रेड पोहत होता. किती छान नाही. म्हणे मनुष्य सगळ्या हुशार प्राणी, अहो कसलं काय. फ्रेड सारखं काळीज आणि माया आताच्या जगात कुठे पहायला मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2018 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...