Home /News /videsh /

फ्रान्समध्ये चर्चजवळ क्रूर चाकूहल्ला, भर रस्त्यात महिलेचा शिरच्छेद; दहशतवादी हल्ल्याची शक्यता

फ्रान्समध्ये चर्चजवळ क्रूर चाकूहल्ला, भर रस्त्यात महिलेचा शिरच्छेद; दहशतवादी हल्ल्याची शक्यता

फ्रान्समधल्या नाईस शहरात एका चर्चमध्ये हा हल्ला झाला. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. नाईसच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

    पॅरिस, 29 ऑक्टोबर : फ्रान्समध्ये हल्ल्यांची मालिका अजूनही सुरू आहे. दक्षिण फ्रान्समधल्या (France stabbing) नीस शहरात (Nice knife attack) एका चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. संशयित हल्लेखोराला ताब्यात धेतल्याची माहिती पोलिसांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली आहे. फ्रेंच वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत क्रूरपणे हा हल्ला झाला. नाईस शहरातल्या नॉत्र दाम चर्चजवळच हल्लेखोरांनी चाकूने थेट हल्ला केला. यात एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. आणखी एक जण रुग्णालयात दाखल करत असतानाच मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. सप्टेंबर महिन्यात पॅरिसमध्ये चार्ली हेब्दो या उपरोधिक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या मॅगझिनच्या ऑफिसजवळ असाच चाकू हल्ला झाला होता. त्यामागे दहशतवादी शक्ती असल्याची शक्यता तेव्हाही वर्तवण्यात येत होती. आता थेट नीस शहरातल्या नॉत्र दाम चर्चमध्ये हल्ला झाल्याने ही शक्यता बळावली आहे. BBC ने दिलेल्या वृत्तानुसार नाईसच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे आणि आणखी काही जण जखमी आहेत. नीसचे मेयर ख्रिस्तियन इस्टोर्सी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाव्हायरचे रुग्ण वाढत असून दुसरी मोठी लाट आल्याने पंतप्रधानांनी आजपासूनच लॉकडाऊन जाहीर केला आहे. आता हे दहशतवादाच्या रूपाने नवं संकट देशात आलं आहे. (ही बातमी अपडेट होत आहे.)
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: France, Terrorist attack

    पुढील बातम्या