Home /News /videsh /

अल्लाहचं नाव घेत चर्चमध्ये घुसून केला महिलेचा शिरच्छेद! फ्रान्स हल्ल्यात 3 ठार, का होत आहेत हे धार्मिक हल्ले?

अल्लाहचं नाव घेत चर्चमध्ये घुसून केला महिलेचा शिरच्छेद! फ्रान्स हल्ल्यात 3 ठार, का होत आहेत हे धार्मिक हल्ले?

France Terror attack in Nice हल्लेखोर अल्लाहू अकबरचा नारा देत सपासप वार करत राहिला. फ्रान्समधल्या या धार्मिक तणावाचं कारण काय?

    पॅरिस, 29 ऑक्टोबर : फ्रान्सच्या नीस (Nice knife attack) शहरात एका माथेफिरू हल्लेखोराने अल्लाह अकबरचा नारा देत चर्चमध्ये घुसून चाकू हल्ला (france terrorism attack) केला. एका महिलेचा थेट शिरच्छेद करत अनेकांना त्यानं भोसकलं. या भीषण हल्ल्यात तीन जण ठार झाले आहेत. नीस शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली, कारण त्यामागे आहे फ्रान्समध्ये सुरू असलेला धार्मिक तणाव. नीसचे मेयर ख्रिस्तियन इस्टोर्सी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. आता नीस शहराच्या चर्चमध्ये हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात आहे. फ्रान्सच्या दहशतवादविरोधी पथकातील अधिकारी या प्रकरणी तपास करत आहेत. नीसमध्ये काय झालं? दक्षिण फ्रान्समधल्या (France stabbing) नीस शहरात (Nice knife attack) मध्यवर्ती भागात असलेल्या नॉत्र दाम या चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. हल्लेखोर अल्लाहू अकबरचा नारा देत सपासप वार करत राहिला, असं स्थानिक वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली आहे. फ्रेंच वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत क्रूरपणे हा हल्ला झाला. नाईस शहरातल्या नॉत्र दाम चर्चजवळच हल्लेखोरांनी चाकूने थेट हल्ला केला. यात एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. आणखी एक जण रुग्णालयात दाखल करत असतानाच मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. फ्रान्समध्ये काय सुरू आहे? काही दिवसांपूर्वीच फ्रान्समधल्या एका शालेय शिक्षाकाचा याच प्रकारे शिरच्छेद करण्यात आला होता.  चेचेन वंशाच्या एका व्यक्तीने शिक्षकाचा असा क्रूर खून करण्यामागचं कारण म्हणे मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र या शिक्षकाने नागरिक शास्त्राच्या तासाला वर्गात दाखवलं. या इस्लामविरोधी कामाची शिक्षा म्हणून त्याचा शिरच्छेद केल्याचं या चेचेन माथेफिरूने सांगितलं. सप्टेंबर महिन्यात पॅरिसमध्ये चार्ली हेब्दो या उपरोधिक मजकूर आणि व्यंगचित्र प्रसिद्ध करणाऱ्या मॅगझिनच्या ऑफिसजवळ असाच चाकू हल्ला झाला होता. त्यामागे दहशतवादी शक्ती असल्याची शक्यता तेव्हाही वर्तवण्यात येत होती. आता थेट नीस शहरातल्या नॉत्र दाम चर्चमध्ये हल्ला झाल्याने ही शक्यता बळावली आहे. नीस हल्ल्यामागे असंच काही आहे की आणखी वेगळं कारण याचा उलगडा अजून झालेला नाही. शिक्षकाच्या हत्येनंतर हा दहशतवादाचाच प्रकार असल्याचं जाहीर करत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी धर्मांध मुस्लिमांविषयी कडक धोरण असल्याचं जाहीर केल्यानंतर मुस्लीम देशांनी फ्रान्सचा निषेध केला होता. पैगंबरांच्या व्यंगचित्राची पाठराखण केल्याचा आरोप मॅक्रॉन यांच्यावर होत आहे. त्यामुळे अनेक मुस्लीम धर्मीयांचा त्यांनी रोष ओढवून घेतला आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: France, Terror acttack

    पुढील बातम्या