Coronavirus मुळे फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा, आर्थिक संकट सावरता न आल्याने सोडलं पद

Coronavirus मुळे फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा, आर्थिक संकट सावरता न आल्याने सोडलं पद

COVID-19 च्या साथीपाठोपाठ आर्थिक गर्तेत सापडलेल्या फ्रान्सला सावरू शकले नाहीत म्हणून पंतप्रधान एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला आहे.

  • Share this:

पॅरिस, 3 जुलै : Coronavirus च्या साथीमुळे वाढलेल्या आर्थिक संकटाने पहिला राजकीय बळी घेतला आहे. COVID-19 च्या साथीपाठोपाठ आर्थिक गर्तेत सापडलेल्या फ्रान्सला सावरू शकले नाहीत म्हणून पंतप्रधान एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला आहे. गेली 3 वर्षं ते पंतप्रधानपदी होते. राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रॉन यांनी फिलीप यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

कोरोना व्हायरसने फ्रान्समध्ये हाहाकार माजवला होता. या साथीत 29875 लोकांचा बळी फ्रान्समध्ये गेला. Coronavirus चा फ्रान्समधला मृत्यूदर आतापर्यंत जगभरातला सर्वाधिक ठरला. कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रत्येत 100 पैकी 17 हून अधिक नागरिकांचा या आजारात जीव गेला. त्यामुळे फ्रान्समध्ये मोठी दहशत पसरली आणि आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला देश ठप्प झाला.

अजूनही फ्रान्सला आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडलेला नाही. या कारणाने एडवर्ड फिलीप यांनी राजीनामा दिला. तो राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या इम्युनेल मॅक्रॉन यांनी तातडीने स्वीकारला. मॅक्रॉन यांना स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्याची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी तातडीने फिलीप यांचा राजीनामा मंजूर केल्याची चर्चा आहे. पुढच्या काही तासांत मॅक्रॉन फ्रान्सच्या नव्या पंतप्रधानांचं नाव घोषित करतील. पुढच्या 2 वर्षांसाठी फ्रान्सला आता नवा पंतप्रधान मिळेल.

लडाखला पोहोचल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांमध्ये मोदींनी केलं ‘हे’ काम, पाहा VIDEO

मंत्रिमंडळाची फेररचना फ्रान्समध्ये अपेक्षितच होती. नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या काही स्थानिक निवडणुकांमधअये मॅक्रॉन यांच्या पक्षाची सर्वत्र हार झालेली होती. त्यामुळे आता पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायचा प्रयत्न म्हणून नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संकलन - अरुंधती

First published: July 3, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading