पॅरिस, 25 मार्च: फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक प्रदर्शनं सुरू आहेत. फ्रान्समधील अनेक ठिकाणी सध्या लोक सत्यावर उतरून हिंसक आंदोलन करत आहेत. तिथे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. गाड्या, दुकानं फोडण्यात आली आहेत. तर रस्त्यावर जाळपोळही करण्यात आला आहे. आठवडाभर धगधगत असलेल्या या हिंसाचारामागे नेमकं काय घडतंय समजून घेऊया.
पेन्शनच्या मुद्द्यावरून फ्रान्समधील आंदोलन अधिकाधिक हिंसक होत आहेत. निदर्शनांदरम्यान 441 पोलीस कर्मचारी आणि इतर अधिकारीही जखमी झाले. त्याचवेळी 450 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली.
गुरुवारी आंदोलकांनी बोर्डो टाऊन हॉल पेटवला. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी फ्रान्समध्ये सुमारे दहा लाख लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनात भाग घेतला. त्याचवेळी राजधानी पॅरिसमध्ये सुमारे 1 लाख 19 हजार लोक आंदोलनात सहभागी झाले होते.
दररोज पिते 3 लीटर पाणी, तरी 14 महिने झाली नाही लघवी; वैद्यकीय तपासणीत समोर आलं धक्कादायक कारण
Is this all from France trying to raise the retirement age? Or is there more to these protests in France? pic.twitter.com/04zXI9rAQu
— TheCuriousCharacter (@kuriouscharactr) March 24, 2023
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पेन्शन बिल मतदान न घेता संसदेत मंजूर केल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून ही आंदोलनं सुरू असून संतप्त लोकांनी आता रस्त्यावर जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली. पॅरिस आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी 450 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी चिनी पोलिसांची अनोखी शक्कल, VIDEO Viral
France has descended to chaos. pic.twitter.com/jc6XgmMNI7
— New Account: Keith (@KeithTopG) March 23, 2023
फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन यांनी शुक्रवारी सांगितले की, काही मोर्चांदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे सुमारे 441 पोलिस आणि इतर अधिकारी जखमी झाले आहेत. यामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.