72 तासांत फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा हल्ला, चर्चच्या फादरवर गोळ्या झाडून हल्लेखोर फरार

72 तासांत फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा हल्ला, चर्चच्या फादरवर गोळ्या झाडून हल्लेखोर फरार

फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही. 72 तासांत दुसऱ्यांदा एकदा हल्ला झाला आहे.

  • Share this:

ल्योन, 01 नोव्हेंबर : फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही. 72 तासांत दुसऱ्यांदा एकदा हल्ला झाला आहे. फ्रान्सच्या ल्योन सिटीमध्ये चर्चच्या गेटवर चर्चच्या फादरवर गोळी झाडून अज्ञात हल्लेखोर फरार झाला आहे. चर्चच्या धर्मोपदेशकाला मारल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 72 तासांतला हा दुसरा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीक पारंपरिक चर्चमधील फादरवर खूप जवळून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

या हल्ल्यात चर्चचे मुख्य धर्मोपदेशन गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. फरार झालेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी लांब काळा कोट घातला होता. या कोटात त्यानं बंदूक लपवून ठेवली होती. ल्योन चर्चच्या जवळ जात त्यानं फादरवर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. फारदवर हल्ला झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल केलं आहे. हल्लेखोरांचा यामागे काय उद्देश आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

हे वाचा-कर्फ्यू लावल्यानंतर या देशाचं रुपच पालटलं; PHOTOS मध्ये दिसतेय भयाण शांतता!

29 ऑक्टोबर रोजी फ्रान्समध्ये नीस शहरात एका चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला फ्रेंच वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत क्रूरपणे हा हल्ला कऱण्यात आला होता. नाईस शहरातल्या नॉत्र दाम चर्चजवळच हल्लेखोरांनी चाकूने थेट हल्ला केला होता. यात एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आला होता. आणखी एक जण रुग्णालयात दाखल करत असतानाच मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले होते.

सप्टेंबर महिन्यात पॅरिसमध्ये चार्ली हेब्दो या उपरोधिक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या मॅगझिनच्या ऑफिसजवळ असाच चाकू हल्ला झाला होता. त्यामागे दहशतवादी शक्ती असल्याची शक्यता तेव्हाही वर्तवण्यात येत होती. आता थेट नीस शहरातल्या नॉत्र दाम चर्चमध्ये हल्ला झाल्याने ही शक्यता बळावली आहे.

First published: November 1, 2020, 9:27 AM IST
Tags: france

ताज्या बातम्या