मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

फ्रान्सची Google वर मोठी कारवाई; ठोठावला तब्बल 1953 कोटींचा दंड

फ्रान्सची Google वर मोठी कारवाई; ठोठावला तब्बल 1953 कोटींचा दंड

फ्रान्सने गुगलवर मोठी कारवाई केली आहे. फ्रान्सच्या Market Competition Regulator ने गुगगला तब्बल 1953 कोटींचा दंड ठोठावला आहे.

फ्रान्सने गुगलवर मोठी कारवाई केली आहे. फ्रान्सच्या Market Competition Regulator ने गुगगला तब्बल 1953 कोटींचा दंड ठोठावला आहे.

फ्रान्सने गुगलवर मोठी कारवाई केली आहे. फ्रान्सच्या Market Competition Regulator ने गुगगला तब्बल 1953 कोटींचा दंड ठोठावला आहे.

  • Published by:  News18 Desk

पॅरिस, 08 जून: आयटी क्षेत्रातील गूगल कंपनीने जगभर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. जगातील सर्वात जास्त डाटा गूगल कंपनीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या कंपनीचं जगभर एकतर्फी वर्चस्व निर्माण झालं आहे. सध्याच्या आधुनिक जगात गुगलशिवाय जगणं कठीण बनलं आहे. अशातच फ्रान्सने गुगलला तब्बल 1953 कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन (Market Competition Regulator) रेग्युलेटरने गूगलवर (Google) ही कारवाई केली आहे. ऑनलाईन जाहिरातींच्या बाजारपेठेत नियम डावलून एकतर्फी वर्चस्व निर्माण केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन गूगलला 22 कोटी यूरो अर्थातच 1953 कोटी रुपये एवढा मोठा दंड केला आहे. खरंतर मागील काही वर्षांपासून युरोपमध्ये अमेरिकन आयटी कंपन्यांचं वर्चस्व वाढत आहेत. त्यामुळे युरोपातील अन्य लघु आणि मध्यम स्वरुपाच्या कंपन्यांवर खूप मोठा दबाव निर्माण झाला आहे. अशातच ऑनलाईन जाहिरातीच्या बाबतीत बाजारपेठेच्या प्रबळ स्थानाचा गैरवापर केल्याच्या कारणावरून फ्रान्सच्या मार्केट नियामकाने सोमवारी गूगलला हा दंड ठोठावला आहे.

फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटरने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, Google च्या जाहिरातीच्या पद्धती भयानक आहेत. कारण गूगल बाजारातील त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि मोबाइल साइट्सच्या प्रकाशक आणि अनुप्रयोग युनिट्सवर दंडात्मक कारवाई करत आहेत. संबंधित निवेदानात पुढे म्हटलं आहे की, एक प्रमुख बलाढ्य आणि वर्चस्व असणाऱ्या कंपनीची एक जबाबदारी असते की ते इतरांच्या हिताकडे दुर्लक्ष करणार नाही. पण Google च्या सेवा विविध पद्धती वापरुन प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध अन्यायकारकपणे स्पर्धा करत आहेत.

हे ही वाचा-Google Chromeची सिक्योरिटी वाढणार,डाउनलोडिंग आधीच समजेल फाईल सेफ आहे की धोकादायक

विशेष म्हणजे फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशनने ठोठावलेल्या दंडाविरोधात फ्रान्समधील गूगल युनिटने अद्याप आव्हान दिलेलं नाही. याउलट बदल प्रस्तावित केले आहेत. संघटनेचे प्रमुख इसाबेल दा सिल्वा यांनी हा निर्णय अभूतपूर्व असल्याचं सांगितलं आहे.

First published:

Tags: Crime news, France, Google