Home /News /videsh /

या मुलाला लागलंय चीजचं वेड, वर्षाकाठी खर्च होतात 2 लाख

या मुलाला लागलंय चीजचं वेड, वर्षाकाठी खर्च होतात 2 लाख

चार वर्षांच्या एका मुलाला चीज खाण्याचं इतका नाद लागलाय की तो उठल्यापासून (Four year old addicted to cheese eats worth Rs 2 lakh cheese yearly) झोपेपर्यंत फक्त चीजच खात असतो.

    लंडन, 30 ऑक्टोबर : चार वर्षांच्या एका मुलाला चीज खाण्याचं इतका नाद लागलाय की तो उठल्यापासून (Four year old addicted to cheese eats worth Rs 2 lakh cheese yearly) झोपेपर्यंत फक्त चीजच खात असतो. लहानपणापासून चीजसाठी हट्ट करणाऱ्या या मुलाला त्याच्या (addiction of cheese) आईवडिलांनी सतत चीज दिल्यामुळे आता तो त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत त्याचं प्रत्येक जेवण हे ‘चीज’मय असतं. भरतो चीजचे बखणे लंडनमध्ये राहणाऱ्या 43 वर्षांच्या डॉन बेकर यांना चार मुलं आहेत. त्यातील सर्वात धाकटा 4 वर्षांचा मुलगा चीजचा शौकिन आहे. त्याच्या चीजच्या वेडापायी बेकर यांना दर आठवड्याला 3500 रुपये खर्च करावे लागतात. त्यांचा मुलगा वर्षाला सुमारे 2 लाखांपेक्षाही अधिक किंमतीचं चीज फस्त करतो. दरमहा बेकर कुटुंबाचे चीजसाठी 14 हजार रुपये खर्च होतात. असं लागलं व्यसन या मुलाच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार तो पोटात असल्यापासूनच चीजचा भोक्ता आहे. हा मुलगा पोटात असताना आईला सतत चीज खावंसं वाटायचं. त्यानंतर बाळाचा जन्म झाल्यावर त्याने पहिल्यांदा जे सॉलिड डाएट घेतलं, ते होतं चीज. त्यानंतर त्यानं चीज खाणं सोडलंच नाही. एखाद्या पदार्थावर चीज नसेल, तर तो त्या पदार्थाकडे पाहतही नाही. जेवणातील प्रत्येक पदार्थावर चीज किसून घातल्यावरच तो ते पदार्थ खात असल्याचं बेकर सांगतात. हे वाचा- विकृत! पतीची हत्या करून मृतदेहाशी लैंगिक संबंध, तरीही झाली सुटका चिंता आणि कौतुक आपल्या मुलानं सतत आणि इतक्या जास्त प्रमाणात चीज खाल्ल्याचा त्याच्या तब्येतीवर काही परिणाम होईल का, अशी चिंता बेकर यांना वाटते. मात्र त्याचवेळी चीज खाल्ल्यामुळेच आपल्या मुलाचे दात मजबूत झाल्याचा अनुभव ते शेअर करतात. मुलाच्या चीज खाण्याचे काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. त्यावर नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. चीज चांगलं असलं तरी कुठल्याही गोष्टीचं व्यसन आणि अतिरेक वाईटच असतो, असं नेटिझन्सनी म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Health, Lifestyle, London, Mother

    पुढील बातम्या