इराकमधील अमेरिकन एअरबेसवर हल्ला, 4 पायलट जखमी

इराकमधील अमेरिकन एअरबेसवर हल्ला, 4 पायलट जखमी

  • Share this:

समारा, 13 जानेवारी : बगदादपासून उत्तरेकडे असलेल्या इराकमधील अमेरिकेच्या एका एअरबेसवर चार रॉकेटचा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये इराकचे चार पायलट जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी चार पायलट जखमी झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, गेल्या दोन आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अल-बलाद एअरबेसवर तैनात असलेले अमेरिकन पायलट आधीच तिथून गेले होते.

इराकचे माजी पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी अमेरिकेला बगदादमधील अमेरिकेचं बगदादमधील सैन्य मागे घेण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर तीन दिवसांनी झाला आहे. महदी यांनी म्हटलं होतं की, अमेरिकेजवळ त्यांचे सैनिक मागे बोलावण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. नोव्हेंबर महिन्यात सरकार विरोधी आंदोलनांनंतर राजीनामा दिला होता. त्यांनी म्हटलं की, अमेरिकेनं त्यांचं सैन्य हटवावं कारण पुढं तणाव वाढू नये असं इराकला वाटतं. इराण आणि अमेरिकेतील तणाव जास्त वाढला आहे.

अमेरिकेने एका हवाइ हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानीला मारलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी महदी यांनी वक्तव्य केलं होतं. बगदादमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर सुलेमानी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुलेमानी ठार झाल्यानंतर इराणने याचा बदला घेऊ असा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेच्या दुतावासावर आणि लष्करी तळांवर इराणने हल्ले केले. या हल्ल्यावेळी इराणकडून युक्रेनचं विमानही पाडलं गेलं. यात 176 प्रवाशांना प्राण गमवावे लागले.

नासात इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्याची कमाल, शोधला दोन सूर्य असलेला ग्रह!

Published by: Suraj Yadav
First published: January 13, 2020, 6:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading