मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बंदुकधारी व्यक्तीकडून इंडियाना मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, आरोपीही ठार

बंदुकधारी व्यक्तीकडून इंडियाना मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, आरोपीही ठार

एका बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. यात चार जण ठार झाले तर तिघे जखमी झाले. मॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका सशस्त्र नागरिकाने हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केलं (Firing In Indiana Mall).

    नवी दिल्ली 18 जुलै : अमेरिकेतून पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. इंडियाना येथील ग्रीनवुड मॉलमध्ये रविवारी संध्याकाळी एका बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. यात चार जण ठार झाले तर तिघे जखमी झाले. मॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका सशस्त्र नागरिकाने हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केलं (Firing In Indiana Mall). पुण्याच्या जोंधळे चौकात भर दिवसा राडा, चौघांनी एकाला पकडलं, दुसऱ्याच्या हातात भलामोठा दगड, हाणामारीचा थरारक VIDEO इंडियाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायफल घेऊन आलेल्या हल्लेखोराने मॉलच्या फूड कोर्टमधील लोकांना लक्ष्य केलं. तो आणखी लोकांना मारण्याआधीच तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने त्याला गोळ्या घालून ठार केलं. मेयर मार्क डब्ल्यू मेयर्स म्हणाले की, चार मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश आहे. रविवारी संध्याकाळी इमर्जन्सी कॉल सेंटरला इंडियाना मॉलमध्ये गोळीबार होत असल्याची माहिती मिळाली. गोळीबार सुरू झाल्यानंतर हल्लेखोराला एका नागरिकाने मारले आणि त्यानंतर गोळीबार थांबला. इंडियाना मॉलच्या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना ग्रीनवुडचे महापौर म्हणाले, "मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला होता. ग्रीनवुड पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मी कमांड पोस्टच्या थेट संपर्कात आहे आणि आता कोणताही धोका नाही. मी जनतेला आवाहन करतो की, तूर्तास या क्षेत्रापासून दूर रहा." 16 वर्षांच्या मुलीला फिरायला घेऊन गेले, सोबत दारू प्यायल्यानंतर कारमध्येच केलं धक्कादायक कृत्य पोलिसांनी सांगितलं की, रविवारी संध्याकाळी अमेरिकेच्या वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता इंडियाना मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. इंडियाना मॉलमध्ये एका व्यक्तीने अचानक लोकांवर गोळीबार केला, नंतर तो स्वतःही मारला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Gun firing

    पुढील बातम्या