फ्लोरिडा येथील रेस्तराँमध्ये गोळीबार; ४ ठार, ११ जण जखमी

फ्लोरिडा येथील रेस्तराँमध्ये गोळीबार; ४ ठार, ११ जण जखमी

अजूनही त्या परिसरातील जनतेमध्ये भितीचे वातावरण असून दुसऱ्या हल्लेखोराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

  • Share this:

फ्लोरिडा, २७ ऑगस्ट- अमेरिकेतील फ्लोरिडा येथे जॅक्सनविल परिसरात रविवारी झालेल्या गोळीबारात ४ ठार तर ११ लोक गंभीर जखमी झाले आहेत. एका रेस्तराँमध्ये हल्लेखोरांनी लोकांवर बेछूट गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारात ४ जण जागीच ठार झाले असून ११ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जॅक्सनविल लँडिंग परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी या मार्गाकडे जाणारे सारे रस्ते बंद केले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला. मात्र त्याच्यासोबत असलेल्या अजून एका हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहेत. अजूनही त्या परिसरातील जनतेमध्ये भितीचे वातावरण असून दुसऱ्या हल्लेखोराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

First Published: Aug 27, 2018 08:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading