S M L

शीतयुद्ध संपवणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर बुश यांचं निधन

बुश यांची विचारधारा विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेमकी विरोधी होती. त्यामुळेच 2016 साली झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीनिअर बुश यांनी ट्रम्प यांना मत दिलं नव्हतं.

Updated On: Dec 1, 2018 05:01 PM IST

शीतयुद्ध संपवणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर बुश यांचं निधन

वॉशिंग्टन, 1 डिसेंबर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश सीनिअर यांचं वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष राहिलेले जॉर्ज बुश सीनिअर हे शीतयुद्ध संपवणारी व्यक्ती म्हणून जगभर ओळखले जातात.

सीनिअर बुश यांच्या निधनानंतर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ‘बुश यांच्या जाण्यानं अमेरिकेनं एक देशभक्त आणि विनम्र सेवक गमावला आहे. त्यांच्या निधनाने मी दु:खी झालो आहे, माझ्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना आहे,’ असंही ओबामा म्हणाले.

कशी राहिली सीनिअर बुश यांची कारकीर्द?

राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जॉर्ज बुश सीनिअर यांनी टेक्ससचे सिनेटर म्हणून अमेरिकन संसदेत प्रतिनिधीत्वही केलं होतं. सीनिअर बुश यांना परराष्ट्र नीतिची चांगली जाण होती.

1989 साली झालेल्या सोव्हिएत युनियनच्या विभाजनात बुश यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यानंतर शक्तीशाली सद्दाम हुसेन यांचा पराभव करण्यासाठी बुश यांनी जागतिक स्तरावर मोठी आघाडी तयार केली होती.

Loading...

सीआयएचे माजी प्रमुख राहिलेले बुश हे केवळ एकच टर्म अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकले. देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याने 1992 च्या निवडणुकीत त्यांना बिल क्लिंटन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

बुश यांची विचारधारा विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेमकी विरोधी होती. त्यामुळेच 2016 साली झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीनिअर बुश यांनी ट्रम्प यांना मत दिलं नव्हतं.


जीव धोक्यात घालून कसे करतात काळजाचा ठोका चुकवणारे स्टंट्स, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 05:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close