• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • तब्बल 16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच त्याने उचललं असं पाऊल

तब्बल 16000 पुरुषांसोबत शारीरिक संबंध; होणाऱ्या बायकोचं सत्य समजताच त्याने उचललं असं पाऊल

टिकटॉकवर @trashley_anonymous या नावानं पूर्वायुष्यात सेक्स वर्करचं काम करणारी ॲश्ले लोकांसोबत तिची जीवन कहाणी शेअर करत असते. तिने अलीकडेच तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबतची कहाणी शेअर केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: सेक्स वर्कर्सचं (Life of Sex Worker) आयुष्य खूपच खडतर असतं. जगातील अनेक महिला असहायतेमुळं असं पाऊल उचलतात. अनेक देशांमध्ये वेश्या व्यवसायाला (Prostitution) कायदेशीर मान्यता आहे तर काही देशांमध्ये यावर बंदी आहे. मान्यता असली तरीही समाज देखील सेक्स वर्कर्सकडं आदरानं बघत नाही. मात्र सध्याच्या काळात काही सेक्स वर्कर्स आपलं आयुष्य आणि आपली असहायता सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडताना दिसतात. ॲश्ले क्लार्क हफमन (Ashley Clark Huffman) ही या पैकीच एक. टिकटॉकवर @trashley_anonymous या नावानं ॲश्ले लोकांसोबत तिची जीवन कहाणी शेअर करत असते. काही वर्षापूर्वी तिनं हा व्यवसाय सोडला असून, ती आता सर्वसामान्य महिलांसारखं आयुष्य जगत आहे. सेक्स वर्कर म्हणून आयुष्य कसं होतं, हे ती सातत्यानं लोकांसमोर मांडत असते. यातच ॲश्लेच्या एका दाव्यानं खळबळ माजली आहे. सेक्स वर्कर म्हणून 16 हजार पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं ॲश्लेनं सांगितलं. मात्र आता ती या व्यवसायातून बाहेर पडली असून, लवकरच लग्न करणार आहे. हे वाचा-अल्पवयीन मुलाने केली आई, वडील, बहीण आणि कुत्र्यांचीही हत्या 'भावी नवऱ्याच्या विचारांचा अभिमान वाटतो' माझ्या भूतकाळाविषयी मला कोणतंही दुःख नाही. मी आता हा व्यवसाय सोडला असून, माझ्या भावी नवऱ्यासोबत आनंदी आहे. लवकरच ते दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. ॲश्लेनं 16 हजार पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले असले तरी या गोष्टीला तिचा भावी नवरा विशेष महत्त्व देत नाही. खरं तर ही बाब नुकतीच ॲश्लेनं तिच्या भावी नवऱ्यासोबत शेअर केली आहे. कदाचित ही गोष्ट तिच्या आयुष्यात भूकंप आणेल, अशी भीती सुरुवातीला तिला वाटली होती. परंतु, भावी नवऱ्याची यावर प्रतिक्रिया पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिनं हा आनंदाचा क्षण नृत्य करत साजरा केला. याचा व्हिडीओ (Tiktok Viral Video) देखील तिनं लोकांसोबत शेअर केला. भूतकाळात असं होतं आयुष्य ॲश्लेनं सुमारे 20 वर्ष सेक्स इंडस्ट्रीत (Sex Industry) काम केलं. या काळात तिनं 16 हजार पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले. या काळात आलेले अनुभव शेअर करताना ॲश्ले सांगते की, 'मला रात्रीची झोप येत नसे. माझ्यातील सेक्सविषयीची इच्छा संपुष्टात आली होती. मी पुन्हा प्रेमात पडेन आणि मला आनंद मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मात्र मला माझ्या भावी नवऱ्यानं जीवनाचा अर्थ समजून सांगितला आणि जीवन कसं जगायचं हे शिकवलं. नुकताच मी भूतकाळातील घटनाक्रम भावी नवऱ्यासोबत शेअर केला. मात्र, तरी देखील त्यानं मला लग्नासाठी प्रपोज केलं.' हे वाचा-दिल्लीत जडलंं प्रेम,नेदरलँड्समध्ये चढले बोहल्यावर! गौरव-प्रणयची अनोखी Love Story ऑनलाइन आहेत लाखो फॉलोअर्स सेक्स इंडस्ट्री सोडल्यानंतर आता ॲश्ले सामान्य जीवन जगत आहे. ती सोशल मीडियावरून आपले अनुभव लोकांसोबत शेअर करत असते. तिनं लग्नाविषयीची घोषणा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करताच तिच्या अनेक फॉलोअर्सनं आनंद व्यक्त केला. खरं प्रेम करणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात आल्यानं लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. अनेकांनी भावी आयुष्यासाठी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
First published: