VIDEO: 'PM इम्रान खान यांना कोकेन घेताना पाहिलं आहे', माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

VIDEO: 'PM इम्रान खान यांना कोकेन घेताना पाहिलं आहे', माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

1987मध्ये इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर इम्रान खान यांनी घरातच ड्रग्जचे सेवन केल्याचा माजी क्रिकेटपटूचा आरोप.

  • Share this:

कराची, 03 नोव्हेंबर : पाकिस्तानचे माजी जलद गोलंदाज सरफराज नवाज (Sarfaraz Nawaz) यांनी पाकचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला आहे. सरफराज यांनी असा दावा केला आहे की, इम्रान कोकेनचे (Drugs) सेवन करत असत. सरफराज यांनी केलेल्या या धक्कादायक आरोपाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरफराज 1970 आणि 80 च्या दशकात पाकिस्तानी संघाकडून खेळत होते. सरफराज यांनी इम्रान खान यांच्यासोबतही अनेक सामने खेळले आहेत. सरफराज यांनी असेही म्हटले आहे की जर इम्रान यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले तर, मी त्यांना न्यायालयात घेऊन जाईन. याआधीही पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंवर ड्रग्ज घेतल्याचे आरोप करण्यात आले होते.

वाचा-काबूल पुन्हा हादरलं, विद्यापीठात ISच्या आत्मघातकी हल्ल्यात 22 ठार

सरफराज यांचा दावा

या व्हिडीओमध्ये सरफराज यांनी 1987 च्या सामन्याचा उल्लेख केला आहे. हा सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. सरफराजच्या म्हणण्यानुसार या सामन्यात इम्रानची कामगिरी चांगली नव्हती. त्या घटनेची आठवण करून देत ते म्हणाले की, इम्रान इस्लामाबादमध्ये त्यांच्या घरी आले होते आणि जेवताना त्यांनी ड्रग्स घेतले होते.

वाचा-'गिलगिट-बाल्टीस्तान रिकामा करा नाहीतर...', प्रांत दर्जावरून भारताचा पाकला इशारा

'नोटमध्ये कोकेन टाकून करायचे सेवन'

गुगली न्यूज TVशी बोलताना सरफराज यांनी, "हा प्रकार माझ्या समोर घडला. इम्रान खान यांनी माझ्या घरी येऊन 10-20 रुपयांच्या नोटमध्ये कोकेन टाकून सेवन करायचे. माझ्या घरी इम्रानबरोबर मोहसीन खान, अब्दुल कादिर आणि सलीम मलिकही होते. त्यांनीही खाल्ल्यानंतर चरसचे सेवन केले". पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर अद्याप स्पष्टीकरण दिले नाही आहे.

वाचा-लाहोरमध्ये लागले अभिनंदन आणि PM मोदींचे फोटो, कारण वाचून बसेल धक्का

कोण आहे सरफराज नवाज?

1969 ते 1984 पर्यंत सरफराज यांनी पाकिस्तानकडून 55 कसोटी आणि 45 एकदिवसीय सामने खेळले आहेत. सरफराज दीर्घकाळ वेगवान गोलंदाजीवर इम्रान खान यांचे साथीदार होते. सरफराज यांना रिव्हर्स स्विंगचा राजा म्हंटले जायचे. कसोटी क्रिकेटमध्ये 177 विकेट घेणारे सरफराज नंतर खासदार झाले.

Published by: Priyanka Gawde
First published: November 3, 2020, 2:41 PM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या