मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Breaking News: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर गोळीबार, प्रकृती गंभीर

Breaking News: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर गोळीबार, प्रकृती गंभीर

 जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार (Former Japan PM Shinzo Abe shot in the chest) करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचे निधन झाले आहे.

  • Published by:  Onkar Danke
मुंबई, 8 जुलै : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार (Former Japan PM Shinzo Abe shot in the chest) करण्यात आला. रॉयटरनं दिलेल्या वृत्तानुसार आबे यांच्या छातीमध्ये गोळी मारण्यात आली आहे. भाषण करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी लागल्यानंतर आबे यांना कार्डियक अरेस्टचाही त्रास झाला आहे. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. आबे यांची प्रकृती चिंताजनक असून मेडिकल टीमनं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवले आहे. जपानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारो शहरामध्ये शिंजो आबे भाषण करत होते. त्यावेळी संदिग्ध आरोपीनं पाठीमागून त्यांच्याशी संपर्क केला आणि अचानक गोळी झाडली. हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता.  जपानी पोलिसांनी संदिग्ध हल्लेखोराला अटक केली आहे. घटनास्थळावर उपस्थित जपानी वाहिनीच्या रिपोर्टरनं आबे यांना खाली कोसळताना पाहिले. त्यांच्या कानातून रक्त वाहात होते. हल्लेखोर कोण होता? त्यानं आबे यांना गोळी का मारली हे अद्याप समजलेलं नाही. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2020 साली प्रकृतीच्या कारणामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
First published:

Tags: Japan

पुढील बातम्या