वॉशिंग्टन,ता.13 एप्रिल: एफबीआयचे माजी प्रमुख जेम्स कोमी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प हे व्हाईट हाईसला माफीया बॉस सारख चालवतात असा आरोप कोमींनी एका पुस्तकात केलाय.
'अ हायर लॉयल्टी, ट्रुथ,लाय अँड लीडरशीप' या पुस्तकात त्यांनी हा आरोप केलाय. कोमी यांचं हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यातल्या काही गोष्टी बाहेर आल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं आहे. कोमी यांना मे 2017 मध्ये ट्रम्प यांनी बडतर्फे केलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प आणि कॉलगर्ल्स यांच्या संबंधाचा व्हिडीओ बाहेर येईल याचीही ट्र्म्प यांना भीती आहे. चूक किंवा बरोबर यात भेद करणं ट्रम्प यांना जमत नसून केवळ खुशमस्कऱ्यांच्या टोळीत ते रमतात अशी टीकाही कोमी यांनी या पुस्तकात केल्याचं वृत्त वॉशिंग्टन पोस्टनं दिलं आहे.
former fbi director criticized trump in his book