Home /News /videsh /

कोरोनाकाळात जग हिंडायचं आहे? या वेगळ्या पासपोर्टची गरज पडण्याची शक्यता

कोरोनाकाळात जग हिंडायचं आहे? या वेगळ्या पासपोर्टची गरज पडण्याची शक्यता

कोरोना व्हायरस (Corona virus) नंतर जगभर मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पर्यटन व्यवसायावरही (Tourism Industry) सध्या मोठ्या प्रमाणात निर्बंध आले आहेत.

    मुंबई, 23 जानेवारी :  कोरोना व्हायरस (Corona virus) नंतर जगभर मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पर्यटन व्यवसायावरही सध्या मोठ्या प्रमाणात निर्बंध आले आहेत. 2020 मध्ये बराच काळ बंद पडलेला हा व्यवसाय आता नवे निर्बंध आणि अधिक खबरदारीसह सुरु झाला आहे. बदलेल्या परिस्थितीमध्ये जगभर फिरणाऱ्या पर्यटांना व्हॅक्सिन पासपोर्ट (Vaccine Passport)  जारी करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थांनी केली आहे. स्पेन (Spain) मधील माद्रिद (Madrid) शहरात ग्लोबल टुरिझम क्रायसेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत आंतरराष्ट्रीय पर्यटन (International Tourism) सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा झाली. या बैठकीत आंतरराष्ट्रीय हेल्थ अँड ट्रॅव्हल संस्थेनं कोरोना टेस्ट प्रोटोकॉलचं पालन करणारी नवी डिजिटल व्यवस्था तयार करण्याचा आग्रह केला आहे. ब्रिटनमध्ये कडक नियम नव्या कोरोना व्हायरसचा (New Coronavirus Strain) मोठा फटका ब्रिटनला बसला आहे. या व्हायरसमुळे ब्रिटन सरकारला देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. जगातील अनेक देशांनी सध्या ब्रिटनमधील विमानसेवा बंद केली आहे. तसंच ब्रिटनमध्ये येणाऱ्या विदेशी नागरिकांना क्वारंटाईन राहवं लागत आहे. दक्षिण अमेरिका आणि पोर्तुगालमधील नागरिकांना ब्रिटनमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. (हे वाचा-बापरे! 5 महिन्यात 31 वेळा कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह, डॉक्टरही हैराण) पर्यटनासाठी आणखी प्रतीक्षा नाही! माद्रीदमध्ये झालेल्या या बैठकीत जागतिक पर्यटन संघटनेसही (UNWTO) निमंत्रण देण्यात आलं होतं. UNWTO संघटनेचे सरचिटणीस झुरब पोलोलिक्सवेली (Zurab Pololikashvili) यांनी आता पर्यटन व्यवसाय सुरु करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करणे शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हॅक्सिन (Corona Vaccine)  उपलब्ध होणे ही चांगली बाब आहे. त्याचसोबत विशिष्ट कागदपत्रांसह लोकांना सुरक्षितपणे जगभर पर्यटनाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. व्हॅक्सिन पासपोर्ट का हवा? आंतरराष्ट्रीय स्तरावर फिरण्यासाठी व्हॅक्सिन पासपोर्ट हा एक सुरक्षित उपाय आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी एक प्रकारची कायदेशीर व्यवस्था तयार होऊ शकेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या