नवी दिल्ली 20 जून: जगात सर्वात शेवटच्या जमिनीवर फिरलेल्या डायनासोरच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. या पाऊलखुणा इंग्लंडच्या केंट भागातील फोल्कस्टोन येथे दिसल्या आहेत. यात तब्बल सहा प्रजातीच्या डायनासोरच्या पायांच्या खुणा आढळून आल्या (Footprints of 6 dinosaur found in UK) आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हे सुमारे 11 कोटी वर्षे जुनी आहेत. त्यांचा असा दावा आहे, की कदाचित हे ब्रिटनच्या भोवती फिरणारे शेवटचे डायनासोर असतील. हेस्टिंग्ज संग्रहालय अॅण्ड आर्ट गॅलरी आणि पोर्ट्समाउथ विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.
डायनासोरच्या पायांचे ठसे केन्टमधील फोल्कस्टोनमध्ये आढळले आहेत. येथील वादळी हवामानामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे समुद्रातील लाटा सतत दगडांना टक्कर देतात. यामुळे आता उंचावर असलेल्या दगडांवर डायनासोरच्या पायाचे ठसे दिसू लागले आहेत. दगडांमधून जीवाश्म बाहेर येत आहेत. बर्याच ठशांमध्ये समुद्राचे पाणी साचलेले आहे.
महाराष्ट्राच्या उंबठ्यावर नवं संकट, तज्ज्ञांच्या माहितीनंतर मोठं टेन्शन
युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टसमॉथचे पॅलेबिओलॉजीचे प्राध्यापक डेव्हिड मार्टिल म्हणतात की, पहिल्यांदाच फोल्कस्टोनमध्ये आम्हाला डायनासोरच्या पायाचे ठसे सापडले आहेत. हा एक अद्भुत शोध आहे. कारण हे ठसे त्या डायनासोरच्या पायाचे आहेत, जे या भागात शेवटचे फिरले होते. त्यानंतर, डायनासोरची प्रजाती नामशेष झाली. येथे आम्हाला सहा प्रजातींच्या डायनासोरच्या पायाचे ठसे आढळले आहेत, असंही ते म्हणाले.
डेविड मार्टिल यांनी सांगितलं, की या सहा प्रजातीचे डायनासोर या परिसरात बराच काळ राहिले आहेत. हे व्हाइट क्लिफ ऑफ डॉवर आणि आसपासच्या परिसरात फिरत असत. पुढील वेळी इथे येताना लोकांना बोटनं भाडं देऊन याठिकाणी यावं लागेल. कारण, या शोधानंतर आता हा परिसर पर्यटनासाठीही प्रसिद्ध होणार आहे. याठिकाणी डायनॉसोरच्या पायाचे ठसे पाहाण्यासाठी लोर मोठ्या प्रमाणात येतील, असंही त्यांनी म्हटलं.
प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेची केली नसबंदी; डॉक्टरांवर गंभीर आरोप
डायनासोरच्या पायाची ठसे याठिकाणी उमटले, तेव्हा येथील माती ओली होती मात्र नंतर ती कडक होऊन दगडाप्रमाणं झाली. मात्र, हे ठसे मिटले नाहीत. वेगेवगळ्या डायनासोरच्या पायाचे ठसे आढळल्यानं इथे बऱ्याच प्रजातीचे डायनॉसोर राहत होते, असा अंदाज आहे. म्हणजेच 11 कोटी वर्षांपूर्वी य़ाठिकाणी मोठ्या संख्येनं डायनासोर राहात होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Other animal, Wild animal