मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Food Crisis in Yemen: येमेनमध्ये अर्धी लोकसंख्या उपासमारीच्या मार्गावर; वेळीच मदत केली नाही तर.. UN चा इशारा

Food Crisis in Yemen: येमेनमध्ये अर्धी लोकसंख्या उपासमारीच्या मार्गावर; वेळीच मदत केली नाही तर.. UN चा इशारा

Food Crisis in Yemen: येमेनमधील एक कोटी 62 लाख लोक म्हणजे देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला पुरेशा अन्नाअभावी गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. पाच वर्षांखालील सुमारे 23 लाख बालकांना कुपोषणाचा धोका आहे. यूएन एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, येमेनचे लोकं पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील परिस्थितीचा सामना करत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

साना, 23 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने हाहाकार उडाला आहे. आता कुठे गाडी रुळावर येईल वाटत असतानाच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ऑमिक्रोन हातपाय पसरत आहे. अशा परिस्थितीत येमेनमधून खूप वाईट बातमी समोर येत आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) ने बुधवारी येमेनमध्ये 1 कोटी 30 लाख लोकांसाठी अन्न सहाय्य सुरू ठेवण्यासाठी आर्थिक संसाधने (Food Crisis in Yemen) संपत असल्याचा इशारा दिला आहे. परिणामी जानेवारी 2022 पासून 80 लाख लोकांना अल्प प्रमाणात रेशनचे वाटप केले जाऊ शकते.

यूएन एजन्सीच्या मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी असलेल्या प्रादेशिक संचालक कॉरीन फ्लेशर यांनी सांगितले की, रेशन कपात झाल्यानंतर आधीच अन्न असुरक्षिततेने ग्रस्त असलेले लोकं आता उपासमारीचे बळी ठरू शकतात. कठीण काळात सक्तीच्या नियमांची गरज असते. आमच्या मर्यादित संसाधनांवर सध्या अतिरिक्त ताण आला असून गंभीर परिस्थितीत लक्ष केंद्रित करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावा लागणार असल्याचे यूएनने म्हटले आहे. येमेनमधील गरजू कुटुंबांच्या रेशन कपातीची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे भयंकर स्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. देशातील मोठ्या संख्येने कुटुंबे त्यांच्या जगण्यासाठी UN एजन्सीच्या अन्न मदतीवर अवलंबून आहेत.

गेल्या तीन महिन्यांमध्ये देशातील सुमारे 50% कुटुंबांना पुरेसे अन्न मिळालेले नाही. चलनाच्या किमतीत घसरण झाली असून महागाईमुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. या वर्षी, येमेनच्या बहुतांश भागात खाद्यपदार्थांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. त्याचबरोबर अनेक आघाड्यांवर लढा सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंबांना बळजबरीने घरदार सोडावे लागले आहेत.

पोटगी म्हणून दिले 5 हजार 540 कोटी रुपये; वाचा 'शाही' घटस्फोटाची Inside Story

पुढच्या वर्षी जानेवारीपासून अन्न सहाय्य कपात झाल्यानंतर कुटुंबांना यूएन एजन्सीकडून निर्धारित केलेल्या किमान दैनंदिन रेशनपैकी फक्त अर्धाच मिळू शकेल. नवीन मदतनिधी नसताना आणखी कपात होण्याची भीती आहे. असे झाल्यास बरेच लोक अन्न सहाय्य कार्यक्रमांच्या कक्षेबाहेर राहू शकतात. कुपोषणाच्या समस्येचा उपचारांवर आणि मुलांना शाळांमध्ये मिळणाऱ्या अन्नावरही परिणाम होऊ शकतो.

येमेनमधील 1 कोटी 62 लाख लोक म्हणजेच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला पुरेशा अन्नाअभावी गंभीर संकटाचा सामना सहन करावा लागत आहे. पाच वर्षांखालील सुमारे 23 लाख बालकांना कुपोषणाचा धोका आहे. यूएन एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, येमेनचे लोक पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील परिस्थितीचा सामना करत आहेत.

यूएन एजन्सीच्या मते, येमेनमध्ये पुढील वर्षी मे पर्यंत या लोकांना मदत सुरू ठेवण्यासाठी 81 कोटीपेक्षा डॉलर्सची आवश्यक असेल. 2022 मध्ये दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या कुटुंबांना मदत सुनिश्चित करण्यासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाला 1 अब्ज 97 कोटी डॉलर्सची आवश्यकता असेल. (एजन्सी इनपुटसह)

First published:

Tags: Food