मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हुकूमशहा किम जोंगचं नवं फर्मान, भाकरी मिळत नसेल तर कुत्र्यांना मारा!

हुकूमशहा किम जोंगचं नवं फर्मान, भाकरी मिळत नसेल तर कुत्र्यांना मारा!

उत्तर कोरियात कोरोनाचं संकट आलेलं नाही असं म्हटलं जात होतं. मात्र काही रुग्ण सापडल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिल्याने खळबळ उडाली होती.

  • Published by:  Ajay Kautikwar

प्योंगयांग 17 ऑगस्ट:  उत्तर कोरियात सध्या अन्न धान्याचं मोठं संकट निर्माण झालं आहे. मात्र त्याबद्दल काहीही माहिती बाहेर येऊ दिली जात नाही. सनकी हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याने आता नवं फर्माण काढलं आहे. अन्न धान्याच्या संकटावर मात करण्यासाठी देशातल्या सर्व कुत्र्यांना मारा असा आदेशच त्याने काढला आहे. किम याच्या या आदेशामुळे देशातल्या सर्वच प्राणी प्रेमींमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्यांना आपल्या घरातल्या सदस्यां प्रमाणे पाळलं त्यांना आता कसं मारायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.

कोरियामध्ये कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं त्यासाठी दरवर्षी 10 लाख कुत्री मारली जातात. त्यामुळे तिथे कुत्र्यांचं पालन आणि संगोपनही केलं जातं. मात्र आता घरांमध्ये कुत्रे पाळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांना बोलण्याची कुठलीही सोय राहिली नाही असंही त्याचं म्हणणं आहे.

किम जोंग उन गेल्या एप्रिल महिन्यात काही दिवसांपासून गायब झाले होते. त्यांबाबत अनेक वावड्या उठल्या होत्या. किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्यानं उपचार सुरू होते अशाही चर्चा समोर येत होती. त्यानंतर तब्बल 21 दिवसांनंतर किम जोंग उन सर्वांसमोर आले होते. उत्तर कोरियाच्या सरकारी न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार 21 दिवसांनंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात ते पहिल्यांदा दिसले.

काय सांगता? जगातून काही वर्षात चॉकलेटच संपून जाणार, कारण वाचून बसेल धक्का!

किम जोंग कुठे आहेत याबाबत उलट सुलट चर्चा केल्या जात होत्या. किम जोंग यांच्यावरची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आणि ते कोमात गेले असल्याची चर्चा होती. त्यांच्या प्रकृतीबाब या देशाने अद्याप याबाबत कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. किम जोंग उन कदाचित जिवंत नसावेत, अशाही वावड्या उठल्या होत्या. मात्र एका समारंभात कारखान्याचं उद्घाटन करताना दिसल्यानं या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

जगातली 6 चित्र अज्ञातस्थळी लपवण्यामागचं काय आहे कारण? जाणून घ्या

उत्तर कोरियात कोरोनाचं संकट आलेलं नाही असं म्हटलं जात होतं. मात्र काही रुग्ण सापडल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिल्याने खळबळ उडाली होती.

First published:

Tags: Kim jong un