मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पुरामुळे कहर; मुसळधार पावसामुळे 400 लोकांचा मृत्यू, 40 हजार लोक बेघर

पुरामुळे कहर; मुसळधार पावसामुळे 400 लोकांचा मृत्यू, 40 हजार लोक बेघर

आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

    केप टाऊन, 17 एप्रिल: दक्षिण आफ्रिकेतील पुरामुळे (Flood in South Africa)मोठी हानी झाली आहे. देशातील सर्वात भीषण आपत्तीमध्ये आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत. दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील डरबन (Durban) शहराच्या काही भागात पाणी शिरलं, त्यामुळे रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. या पुरात रुग्णालय-घरे उद्ध्वस्त झाली असून लोक या पाण्यात वाहून गेले आहेत. शनिवारी माहिती देताना सरकारने सांगितले की, या आपत्तीतील मृतांची संख्या 398 वर गेली आहे, तर 27 लोक बेपत्ता आहेत. 40 हजारांहून अधिक लोक बेघर झाल्याचंही सरकारने सांगितलं. सरकारच्या म्हणण्यानुसार, घरांमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांपासून लष्कर आणि स्वयंसेवकांपर्यंत शोध आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. बचाव पथकाच्या म्हणण्यानुसार, डरबन जिल्ह्यातील बेपत्ता कुटुंबातील 10 लोकांपैकी एकाचाही अद्याप शोध लागलेला नाही. गोरखनाथ मंदिर हल्ला: मुर्तझा आणि दहशतवाद्यांमधलं नवं  Online कनेक्शन समोर  डरबन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहिल्या पुरानंतर 6 दिवसांनी, वाचलेल्यांचा शोध घेण्याची आशा आता फारच कमी आहे. त्यांनी सांगितले की, लोक त्यांच्या बेपत्ता नातेवाईकांना शोधण्यासाठी भटकत आहेत. परिस्थिती पाहता, सरकारने आपत्कालीन मदत निधीमध्ये एक अब्ज रँड ($68 मिलियन) जाहीर केले आहेत. याव्यतिरिक्त, आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे प्रमुख पॅट्रिस मोत्सेपे यांनी 30 दशलक्ष रँड ($2.0) जाहीर केले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Rain flood, South africa

    पुढील बातम्या