• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • महापुरामुळे हाहाकार! 68 जणांचा मृत्यू तर 100 बेपत्ता

महापुरामुळे हाहाकार! 68 जणांचा मृत्यू तर 100 बेपत्ता

जर्मनीसोबतच शेजारील लक्झमबर्ग, नेदरलँड आणि बेल्जियम देशांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 जुलै : युरोपच्या पश्चिम भागात काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला आहे (Europe Floods). या महापुरामुळे आतापर्यंत जर्मनीत 59, तर बेल्जिअममध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपात एकूण 100 हून अधिक लोक बेपत्ता (Europe 100 missing) असल्याचंही सांगण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच जर्मनीला निसर्गाचं असं रौद्ररुप पहायला मिळत आहे. जर्मनीमधील युकिर्शेन प्रांतात 15, अहर्विलर काउंटीत (Ahrweiler county) 18, रिनबॅच प्रांतात तीन आणि कोलोन प्रांतात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अहर्विलर काउंटीमधील अधिकाऱ्यांनी सांगितले, की अचानक आलेल्या या पुरामुळे काल रात्री कित्येक घरं उद्ध्वस्त झाली. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 70 लोक बेपत्ता झाले आहेत. कित्येक लोक हे आपल्या घरांच्या छतावर अडकून पडले आहेत आणि मदत मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. बचावासाठी अधिकारी बोटी आणि हेलिकॉप्टर्सची मदत पुरवत आहेत. तसेच, बचावकार्यासाठी जर्मनीच्या सेनेतील 200 सैनिकांना पाचारण करण्यात आलं आहे. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिलं आहे. लक्झमबर्ग, नेदरलँड आणि बेल्जियमलाही तडाखा जर्मनीसोबतच शेजारील लक्झमबर्ग, नेदरलँड आणि बेल्जियम देशांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यामुळे या देशांमधील सर्व नद्यांना पूर आलाय. कित्येक ठिकाणी नदीकाठचे संरक्षक कठडे तुटल्याचेही पहायला मिळत आहेत. अचानक आलेल्या या पुरामुळे कित्येक गाड्या वाहून गेल्याचे, तसेच इमारती कोसळल्याचे दिसून येत आहे. बेल्जिअममध्ये कित्येक महामार्गांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तसंच, फोन आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. Anil Deshmukh: अनिल देशमुखांना ईडीचा दणका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त चॅन्सलर मॉर्केल अमेरिका दौऱ्यावर दरम्यान, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मॉर्केल सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्तांची परिस्थिती पाहून आपल्याला अतिशय दुःख झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या काळात अशी आणखी संकटं येऊ शकतात अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच, लोकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बायडेन यांनी व्यक्त केली संवेदना; युरोपीय संघही मदतीसाठी तयार अँजेला यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनीही पूरग्रस्तांबद्दल संवेदना व्यक्त केली. यासोबतच युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर यांनीही ट्विट करत या परिस्थितीबद्दल खेद व्यक्त केला. तसंच जर्मनी आणि इतर देशांच्या मदतीसाठी युरोपीय संघ तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
  First published: