अलर्ट! भूकंप, चक्रीवादळानंतर पृथ्वीच्या दिशेनं येत आहेत तब्बल 5 संकटं

अलर्ट! भूकंप, चक्रीवादळानंतर पृथ्वीच्या दिशेनं येत आहेत तब्बल 5 संकटं

सारं जग सध्या कोरोनासारख्या महामारीशी दोनहात करत आहे. यातच आणखी एक संकट पृथ्वीच्या दिशेनं येत आहं. नासानं (NASA) या संकटाबाबत माहिती दिली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 10 जून : सारं जग सध्या कोरोनासारख्या महामारीशी दोनहात करत आहे. यातच आणखी एक संकट पृथ्वीच्या दिशेनं येत आहं. नासानं (NASA) या संकटाबाबत माहिती दिली आहे. नासानं दिलेल्या माहितीनुसार येत्या2-3 दिवसांत पृथ्वीच्या दिशेनं 5 उल्का (Asteroid) येणार आहेत. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स नेटवर्कच्या मते, काळजी करण्याची काहीच कारण नाही आहे, कारण या सर्व उल्का पृथ्वीपासून 46.5 मैलांपेक्षा कमी अंतरावरून जातील.

NASAच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिक पृथ्वीवरील दिशेने वेगाने येणाऱ्या प्रत्येक उल्केवर लक्ष ठेवून आहेत. नासाची Sentry सिस्टम आधीपासूनच अशा संकटांवर लक्ष ठेवते आणि पुढच्या 100 वर्षात अशा 22 उल्का येणार असल्याचा इशाराही दिला आहे.यातील काही उल्का पृथ्वीवर आदळण्याचीही शक्यता आहे.

पुढील तीन दिवसांत पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल

पहिल्या दोन उल्का Asteroid 2013XA22 (310 फूट, 18 दशलक्ष मैल दूर) आणि Asteroid 2020KZ3 (64 फूट, 7 दशलक्ष 61 हजार मैल दूर) या मंगळवारी रात्री पृथ्वीच्या जवळून गेल्या आहेत.या दोघांमुळेही कोणतीही हानी झालेली नाही. आज 65 फूट लांब एक उल्का Asteroid 2020KY 40 मैलांवरून जाईल. यानंतर, दुसर्‍या दिवशी गुरुवारी आणखी 65 फूट लांब उल्का 36 लाख मैलांवरून जाईल. 11 जून रोजीच, 60 फूट लांब आणखी एक उल्का जाणार आहे.

6 जून रोजी गेली एक उल्का

नासानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा एक मोठी उल्का 6 जून रोजी पृथ्वीच्या दिशेनं आली होती. नासानं या उल्काचं नाव रॉक-163348 (2002 NN4) असे ठेवण्यात आले होते. याची लांबी 250 से 570 मीटर होती. नासानं दिलेल्या माहितीत ही उल्का सूर्याच्या जवळून जात पृथ्वीच्या कक्षेत येणार होती. मात्र तसं झालं नाही.

First published: June 10, 2020, 11:39 AM IST

ताज्या बातम्या