मोहम्मद हसन माफी मागताना म्हणाला, 'मित्रांनो, काल (शुक्रवारी) काय झाले ते आपण पाहिले असेलच. मी भावनेच्या भरात भरपूर काही बोलून गेलो. त्यात शिखांविरोधात बोललो. गुरुद्वारा पाडून त्या जागेवर मशीद बांधण्याची धमकी दिले. असा आमचा हेतू नव्हता. गुरुद्वाराला घेराव घालून दगडफेक करण्याचे आमच्या मनातही नव्हते. भावनेच्या भरात मी या सर्व गोष्टी बोलून गेलो. माझ्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या असतील. मी सगळ्यांची माफी मागतो. त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझे बांधव होते, आहे आणि भविष्यातही राहणार.' भाजप आणि काँग्रेस यांच्यात 'ट्विटरवॉर' पाकिस्तानात ननकाना साहिब गुरुद्वाराबाहेर शुक्रवारी दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीवरुन भारतात भाजप आणि काँग्रेस यांच्यात 'ट्विटरवॉर' सुरु झाला आहे. दगडफेकीदरम्यान काही भक्त गुरुद्वारमध्ये अडकले होते. या घटनेनंतर परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे. या घटनेचे तीव्र पडसाद भारतातील राजकारणावर पडताना दिसत आहे. भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. ‘ननकाना साहिबमध्ये एकही शीख राहू देणार नाहीत’, अशाप्रकारची धमकी इस्लामच्या नावाने आपल्या शीख बांधवांना दिल्या जात आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांचा छळ होतोय. काँग्रेसला आणखी किती पुरावे हवे आहेत? असा सवाल संबिता पात्रा यांनी केला. छत्तीसगड काँग्रेसने संबित पात्रा यांच्या या ट्वीटला प्रत्युत्तर दिले. ‘मित्रांनो दोन दिवसांपूर्वी भाजपचा एक प्रवक्ता काँग्रेसचा नेता म्हणत खोटा व्हिडिओ ट्विट करतो. त्यानंतर आज पाकिस्तानचे पंतप्रधान एक खोटा व्हिडिओ ट्वीट करत भारतची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. तो व्हिडिओ खोटा असल्याचे समोर येताच ते तो व्हिडिओ डिलिटही करतात.’ भाजप आणि पाकिस्त्तानमध्ये ही नेमकी कोणत्या प्रकारची जुगलबंदी आहे? असा सवाल काँग्रेसने केला.Imran who uttered objectionable words against Sikhs yesterday apologises today for his misconduct . pic.twitter.com/cTmThmvSgR
— Kh khalid Farooq (@Kkf50) January 4, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.