मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू मुलगी झाली ऑफिसर, सना गुलवानीचं अभूतपूर्व यश

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू मुलगी झाली ऑफिसर, सना गुलवानीचं अभूतपूर्व यश

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू मुलगी (Hindu girl becomes officer in Pakistan) ऑफिसर झाली आहे.

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू मुलगी (Hindu girl becomes officer in Pakistan) ऑफिसर झाली आहे.

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू मुलगी (Hindu girl becomes officer in Pakistan) ऑफिसर झाली आहे.

  • Published by:  desk news

लाहोर, 21 सप्टेंबर : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक हिंदू मुलगी (Hindu girl becomes officer in Pakistan) ऑफिसर झाली आहे. पाकिस्तानमधील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत सना रामचंद्र गुलवानीनं (Sana Ramchandra Gulwani) घवघवीत यश मिळवलं आहे. 37 वर्षीय सनानं पहिल्याच प्रयत्नात ही अवघड परीक्षा उत्तीर्ण होण्याचा (Cracked the tough exam) विक्रम नोंदवला आहे. वास्तविक, सना मे महिन्यात या परिक्षेत उत्तीर्ण झाली होती, मात्र सोमवारी तिच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

पाकिस्तानातील सर्वात अवघड परीक्षा

पाकिस्तानातील सेंट्रल सुपिरिअर सर्व्हिसेस (CSS) ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. भारतात ज्याप्रमाणे युपीएससी परीक्षा घेण्यात येते, त्याचप्रमाणे पाकिस्तानात सीएसएस ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी सना गेल्या काही वर्षांपासून तयारी करत होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आनंदी झालेल्या नेहानं नियुक्ती मिळताच ‘वाहे गुरुजी का खालसा वाहे गुरुजी की फतेह’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानातील ही परीक्षा इतकी अवघड असते की त्यात केवळ 2 टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होतात. सनानं पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा क्रॅक केल्यामुळे तिचं सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

हे वाचा - कोण आहेत आनंद गिरी? यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद

अधिकारी होण्याचं स्वप्न

सना ही मूळची शिकारपूरची रहिवासी आहे. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’नं दिलेल्या बातमीनुसार सनाने सिंध प्रांतात ग्रामीण भागातून ही परीक्षा दिली होती. आपली पहिल्यापासूनच सरकारी अधिकारी म्हणून जनतेची सेवा करण्याची इच्छा होती. पाच वर्षांपूर्वी सनानं बेनझीर भुत्तो वैद्यकीय विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसीनची पदवी मिळवली आहे. त्यानंतर ती सर्जनदेखील झाली आहे. तर युरॉलॉजी विषयातील मास्टर डिग्रीदेखील तिने मिळवली आहे. आपलं स्वप्न साकार झाल्याचा मनापासून आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया सनानं दिली आहे.

First published:

Tags: Pakistan, Success story