इंग्लडमध्ये पार पडला पहिला समलैंगिंक तरुणाचा 'निकाह'

इंग्लडमध्ये पार पडला पहिला समलैंगिंक तरुणाचा 'निकाह'

बांग्लादेशी वंशाचा जाहेद चौधरी हा समलैंगिक विवाह करणारा पहिला मुस्लिम ठरलाय. जाहेद हा 24 वर्षांचा असून त्यानं 19 वर्षांच्या सीन रोगनशी लग्न केलंय.

  • Share this:

13जुलै: एकीकडे भारतात समलैंगिकतेबद्दल पूर्णपणे मौन बाळगलं जात असतानाच पश्चिम जगात मात्र या लग्नांची स्वीकारार्हता वाढतच चाललीय. इंग्लडमध्ये बांग्लादेशी वंशाचा जाहेद चौधरी हा समलैंगिक विवाह करणारा पहिला मुस्लिम ठरलाय. जाहेद हा 24 वर्षांचा असून त्यानं 19 वर्षांच्या सीन रोगनशी लग्न केलंय. हे लग्न बांग्लादेशी पद्धतीने करण्यात आलं.

जाहेदला लहानपणापासूनच आपण समलैंगिक असल्याची जाणीव होती. तो समलैंगिक असल्यामुळे लहानपणापासूनच त्याला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या. शाळेत मुलं त्याला छळायची. एकदा मशिदीत गेला असता मशिदीबाहेर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्याला मशिदीत येण्याची परवानगी नाकारली गेली.

'माझ्या शाळेत मुलं माझ्यावर थुंकायचे. मला डस्टबिनही फेकून मारले जायचे' असं जाहेद सांगतो. त्याला समलैंगिकतेपासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला गेला. त्याने एक गर्लफ्रेंडही बनवली होती. पण असं खोटं जगणं त्याला असहाय्य झालं आणि त्यानं सारं संपवायचा निर्णय घेतला.

'मी बेन्चवर बसून रडत होतो जेव्हा सीन मला येऊन भेटला. त्याने माझी विचारपूस केली. आयुष्यातल्या सगळ्यात वाईट काळात त्यानं मला आशेचा किरण दाखवला'. असं सांगताना जाहेद भावूक झाला. लवकरच दोघं एकामेकाला डेट करू लागले आणि सोबतही राहू लागले. दोन वर्ष सोबत राहिल्यानंतर जाहेदने सीनला लग्नासाठी प्रपोज केलं.

दोघांनीही जवळच्या मित्रांच्या साक्षीने वॉलसाल, इंग्लडमध्ये लग्न केलं. लग्न केल्यावर साऱ्या जगाला 24 वर्षांच्या जाहेदने एक संदेश दिलाय 'या जगात जे जे माझ्यासारख्या त्रासाला सामोरे जात आहेत त्यांना मला एवढंच सांगायचंय की असं असण्यात काहीच गैर नाही. या जगात आपण गे आणि मुस्लिम असूनही जगू शकतो'.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 08:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading