Home /News /videsh /

आग विझवताना वडिलांचा मृत्यू, दोन वर्षीय चिमुकल्याने स्वीकारले शौर्य पदक; डोळ्यात पाणी आणणारा PHOTO

आग विझवताना वडिलांचा मृत्यू, दोन वर्षीय चिमुकल्याने स्वीकारले शौर्य पदक; डोळ्यात पाणी आणणारा PHOTO

ऑस्ट्रेलियात लागलेली आग विझवताना जिओफ्री यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाजवळ चिमुकल्याने वडिलांसाठी लिहलेला संदेश डोळ्यात पाणी आणणारा आहे.

    सिडनी, 07 जानेवारी : ऑस्ट्रेलियातील जंगलामध्ये गेल्या चार महिन्यांपासून आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी 3 हजारहून अधिक अग्निशामक दलाचे जवान काम करत आहेत. ही आग भीषण असल्यानं उष्णतेचं प्रमाणही वाढलं आहे. अशा परिस्थितीत जीवाची पर्वा न करता जवान आग विझवण्यासाठी झटत आहेत. आतापर्यंत अनेक जवान जखमी झाले तर एक जवान शहीद झाला. जिओफ्री किटन असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार दोन वर्षाच्या चिमुकल्याने स्वीकारला. या मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिडनीमध्ये 19 डिसेंबर 2019 ला जिओफ्री किटन यांचा मृत्यू झाला होता. सिडनीच्या दिशेने पसरणारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना कीटन आणि त्यांच्या एका सहकाऱ्याचाही मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या गाडीवरच झाड कोसळून दुर्घटना घडली होती. आग विझवताना प्राण गमावलेल्या जिओफ्री किटन यांच्यावर न्यू साउथ वेल्स इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले होते. त्यावेळी त्यांचा दोन वर्षांचा मुलगाही अग्निशामक दलाच्या गणवेशात होता. वडिलांचे शौर्य पदक स्वीकारतानादेखील त्यानं गणवेश घातला होता. जिओफ्री यांच्या मुलाने त्यांच्या पार्थिवाजवळ एक कॉफी मग ठेवला होता. त्यावर लिहिलं होतं की, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही चंद्रावर जात आहात. तिथून लवकर परत या. चिमुकल्याचा हा वडिलांसाठीचा संदेश वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. गतवर्षी अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 13 जानेवारीपासून 4 दिवसीय भारत दौरा रद्द केला आहे.  स्कॉट मॉरिसन म्हणाले की, सध्या देशात आगीचा वणवा भडकला आहे. या संकटात आमचे लक्ष देशातील लोकांना मदत करण्याकडे आहे. काही लोकांची सुखरूप सुटका झाली असून काही अजुनही आगीशी झुंज देत आहेत. ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या 50 कोटी प्राण्यांसाठी दिग्गज खेळाडू विकणार टोपी युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकॉलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत 18 लोकांचा आणि जवळपास 50 कोटी प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या मध्य उत्तर भागात सर्वाधिका प्राणी आहेत. या भागालाही आगीने वेढले आहे. किनाऱ्याकडे वेगाने पसरणाऱ्या या आगीमुळे आतापर्यंत 200 हून अधिक घरांचे नुकसान झालं आहे. काही लोक आगीच्या वेढ्यात अडकले आहेत. वाचा : ऑस्ट्रेलियात भीषण आग, 50 कोटी प्राण्यांनी गमावला जीव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या