लंडनमध्ये 27 मजली टॉवरला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती

घटनास्थळी 40 अग्निशामक दलाच्या गाड्या आणि 200 अग्निशामक जवान दाखल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2017 09:28 AM IST

लंडनमध्ये 27 मजली टॉवरला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती

14 जून : पश्चिम लंडनमध्ये 'ग्रेनेफेल टॉवर' या 27 मजली रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. अनेक जण इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापासून ते अगदी शेवटच्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे.

Loading...

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, इमारतीतून किंचाळण्याचे आवाज येत असून इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 40 गाड्या दाखल झाल्या आहेत. 200 जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2017 09:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...