स्फोटांनी हादरल्यानंतर आता बैरूत पुन्हा संकटात! आगीचं भीषण तांडव सुरू असल्याचा VIDEO VIRAL

स्फोटांनी हादरल्यानंतर आता बैरूत पुन्हा संकटात! आगीचं भीषण तांडव सुरू असल्याचा VIDEO VIRAL

सुमारे महिन्याभरापूर्वी भीषण स्फोटांनी हादरलेल्या आणि उद्धवस्त झालेल्या बैरूत (beirut blast)शहरात पुन्हा आज आगीचं तांडव सुरू आहे. पाहा VIDEO

  • Share this:

बैरूत, 10 सप्टेंबर : सुमारे महिन्याभरापूर्वी भीषण स्फोटांनी हादरलेल्या आणि उद्धवस्त झालेल्या बैरूत (Beirut blast)शहरात पुन्हा आज आगीचं तांडव सुरू आहे. प्रचंड मोठी आग भडकल्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेबननची (Lebanon) राजधानी बैरूतमध्ये पुन्हा एकदा धडकी भरवणारी ही आग लागली आहे.

4 ऑगस्टला झालेल्या बैरूतमधल्या (Berut blast) स्फोटांबद्दल वेगवेगळे दावे अजूनही सुरू आहेत. दारूगोळा कारखान्यात हा स्फोट झाला होता. सुमारे महिन्याभरापूर्वी भीषण स्फोटांनी हादरलेल्या आणि उद्धवस्त झालेल्या बैरूत (beirut blast)शहरात गुरुवारी पुन्हा आगीचं तांडव सुरू झालं. बैरूत बंदराच्या परिसरात ही आग लागली आहे. सोशल मीडियावर आगीचे लोळ उठलेला VIDEO व्हायरल झाला आहे. ही आग कशाने लागली याबद्दल अद्याप काहीच स्पष्ट झालेलं नाही.

महिन्याभरापूर्वी झालेल्या स्फोटांबद्दल इस्त्रायली विश्लेषकांनी असा दावा केला आहे की, बैरूतमध्ये एक नाही तर 43 सेकंदात 6 बॉम्बस्फोट झाले. शेवटच्या 4 बॉम्बस्फोटांनी एका सेकंदापेक्षा कमी वेळ घेतला आणि मोठा धमाका केला. दुसरीकडे, बैरूतच्या लोकांचे म्हणणे आहे की स्फोट झाल्यापासून त्यांची घरातली घड्याळं बंद आहेत. या प्रकरणात सैन्य हल्ल्याची चौकशी करण्यासाठी अमेरिकेने या तपासात एफबीआयचा समावेश असल्याचेही म्हटले आहे.

6 स्फोट सुमारे 11-11 सेकंदानंतर घडले. शेवटचा स्फोट म्हणजे 4 स्फोटांच्या बरोबरीचा एक होता. यामुळे गोदामात साठवलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. दुसरीकडे, स्फोटांच्या तपासणीत गुंतलेल्या आयआरआयएसने म्हटले आहे की ही केवळ 5 लहान आणि एक अतिशय मोठी स्फोटांची मालिका होती.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 10, 2020, 5:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading