Home /News /videsh /

कॅलिफोर्नियातील धगधगत्या आगीचा VIDEO, 8 जणांचा होरपळून मृत्यू

कॅलिफोर्नियातील धगधगत्या आगीचा VIDEO, 8 जणांचा होरपळून मृत्यू

ही आग एका दिवसात 40 किलोमीटरपर्यंत पसरली. पाहता पाहता काही तासांत 1,036 चौरस किलोमीटर क्षेत्राची राख झाली

    कॅलिफोर्निया, 11 सप्टेंबर : बैरूद आणि जॉर्डननंतर आता कॅलिफोर्नियातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथल्या जंगलाला लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण केलं असून ही आग पश्चिमेच्या दिशेनं सरकताना दिसत आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात कॅलिफोर्नियात नुकसान झालं आहे. जैवविविधतेनं नटलेलं हे शहर आता भकास आणि राख होताना डोळ्यात समोर दिसत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण कठीण असून ही आग अतिशय वेगानं पसरत असल्याची माहिती तिथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. या आगीत आतापर्यंत 1 हजारहून अधिक लोकांची घरं जळून राख झाली तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं असून 5 लाख लोकांनी आपलं घर सोडून स्थलांतर केलं आहे. दिवसेंदिवस ही आग अधिक रौद्र रुप धारण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे वाचा-बैरूदसारख्या स्फोटानं हादरलं जॉर्डन, आकाशात दिसले आगीचे गोळे, पाहा VIDEO सॅन फ्रान्सिस्कोच्या ईशान्य पूर्वेतील प्लुमास नॅशनल फॉरेस्टमध्ये बुधवारी लागलेली ही आग एका दिवसात 40 किलोमीटरपर्यंत पसरली. पाहता पाहता काही तासांत 1,036 चौरस किलोमीटर क्षेत्राची राख झाली. जंगलात या वेगाने पसरलेल्या आगीमुळे लोकांची चिंता वाढली आहे. या आगीतून लोकांना बाहेर काढणंही कठीण होत आहे. वाऱ्याच्या वेगानं ही पसरणारी आग धोकादायक ठरत आहे. हे वाचा-9/11 Attack Anniversary: 19 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे काटा आणणारे PHOTO ऑरेगनमध्ये ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. या वाऱ्याच्या वेगामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ओरेगॉनच्या पश्चिमेला असलेला काही भागांमध्ये लोकवस्ती देखील आहे. तिथल्या लोकांना तातडीनं घरं खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या