आठवड्यातून 3 दिवस सुट्टी आणि 6 तासांची शिफ्ट; जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधानांनी घेतला निर्णय

आठवड्यातून 3 दिवस सुट्टी आणि 6 तासांची शिफ्ट; जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधानांनी घेतला निर्णय

जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून चर्चेत असणाऱ्या फिनलंडच्या सना मरिन यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • Share this:

हेलसिंकी (फिनलंड), 7 जानेवारी : जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून चर्चेत असणाऱ्या फिनलंडच्या सना मरिन यांनी आणखी एक मोठा निर्णय घेत जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कामाबरोबरच कुटुंबाचं महत्त्व मोठं आहे, हे लक्षात घेत त्यांनी फिनलंडमध्ये आठवड्यातून 5 दिवसांऐवजी 4 दिवस दररोज सहा तास कामाचा प्रस्ताव ठेवला आहे.

वर्क लाइफ बॅलन्सबद्दल नेहमी बोललं जातं. पण जगभर कर्मचाऱ्यांकडून अधिकाधिक काम करून घेण्यातच धन्यता मानली जाते. अनेक जण दिवसभरातला सर्वाधिक वेळ ऑफिसमध्येच घालवतात. पण अधिक तास कामापेक्षा अधिक चांगलं काम करण्याकडे फिनलंडच्या या तरुण तुर्क पंतप्रधानांचा कल आहे.

पुरेसा वेळ कुटुंबाला देता आला की कर्मचारी कामावर येताना फ्रेश असतील आणि यामुळे कामाचे तास कमी केले तरी उत्पादकता वाढेल, असं सना मरिन यांनी म्हटलं आहे. "देशाला आता आठड्याला 5 दिवस दररोज 8 तास काम करण्याची गरज नाही."

मरिन यांनी शेजारी स्वीडन या देशाचा आदर्श याबाबतीत ठेवला आहे. स्वीडनमध्ये 2015 पासून दिवसाला 6 तास कामाची शिफ्ट ठेवलेली आहे. शिवाय या देशात आठवड्यातून 3 दिवस सुट्टी असते.

हे वाचा - बांग्लादेशी स्थलांतरित छोट्या सोबोर्नोचा VIDEO पाहून थक्क व्हाल

"मला वाटतं, लोक आपल्या कुटुंबीयांसमवेत आणि प्रिय व्यक्तींबरोबर वेळ घालवतील तेव्हा दुप्पट क्षमतेनं काम करतील", असं मरीन म्हणतात.

जगभरात या ठिकाणीही आहे 3 दिवस सुट्टी

आपल्या देशात अजूनही सर्व सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात 5 दिवसांचा आठवडा नाही. 6 दिवस काम आणि एक दिवस सुट्टी अशीच रचना आहे. त्यात आता कामाचे तासही वाढवण्यात आले आहेत. अनेक कंपन्यांमध्ये साडेनऊ तासांची शिफ्टही आहे. पण जगात असेही काही देश आणि कंपन्या आहेत, ज्या आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करायला सांगतात. गेल्या नोव्हेंबरपासून जपानमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने 4 दिवसांचा आठवडा ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. तिथे 3 दिवस सुट्टी असते. स्वीडनमध्ये गेली 5 वर्षं आठवड्यातून तीन दिवस सुटी दिली जाते. त्यांचा देशाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झालेला नाही.

सना मरीन यांनी 2019 मध्ये परिवहन मंत्री म्हणून काम करताना 4 दिवसांच्या आठवड्याची संकल्पना मांडली होती. पण उत्पादकतेवर परिणाम होईल, म्हणून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. आता स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हा प्रस्ताव ठेवला आहे. फिनलंडची जनता पंतप्रधानांच्या या निर्णयावर खूश आहे.

----------------------

अन्य बातम्या

घरात निघाला 8 फुटांचा अजगर; त्या सापाशी खेळतोय मुलगा, पाहा VIDEO

फाशी देताना दोर तुटला तर शिक्षा माफ होते का?, वाचा काय आहे नियम

मनसेचा झेंडा प्रसिद्ध होण्याआधीच वाद पेटला, संभाजी ब्रिगेडने केला तीव्र विरोध

अमेरिकेनं 52ची धमकी देण्यापूर्वी 290 आकडा लक्षात ठेवावा, इराणचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2020 06:50 PM IST

ताज्या बातम्या