• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भारताच्या शेजारी देशात खाण्यापिण्याचे वांधे; दुकानांमध्ये खडखडाट, रस्त्यांवर रांगा

भारताच्या शेजारी देशात खाण्यापिण्याचे वांधे; दुकानांमध्ये खडखडाट, रस्त्यांवर रांगा

भारताचा शेजारी (Neighbor) असणाऱ्या देशावर सध्या मोठं आर्थिक संकट (Economic Crisis) ओढवलं आहे.

 • Share this:
  कोलंबो, 16 सप्टेंबर : भारताचा शेजारी (Neighbor) असणाऱ्या देशावर सध्या मोठं आर्थिक संकट (Economic Crisis) ओढवलं आहे. हा देश आहे श्रीलंका. श्रीलंकेत (Sri Lanka) खाण्यापिण्याच्या वस्तू, (Eatables) दूध पावडर,(Milk Powder) गहू,(wheat) तांदूळ (Rice) यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड टंचाई (Shortage) निर्माण झाली आहे. इथल्या अनेक सुपरमार्केटच्या (super market) बाहेर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचं चित्र आहे. मात्र दुकानांमध्ये काहीही नसल्यामुळे नागरिकांना निराश होऊन घरी परतावं लागत आहे. सर्वदूर पडलेला दुष्काळ आणि सरकारी तिजोरीतील ख़डखडाट या दोन कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगण्यात येत आहे. साठेबाजी रोखण्यासाठी सैन्य तैनात गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत अन्नधान्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. साठेबाजी करून चढ्या किंमतीला जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जात आहे. हे प्रकार टाळण्यासाठी साठेबाजांवर आता सैन्याकरवी लक्ष ठेवलं जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. का उद्भवली परिस्थिती? श्रीलंकेत ही परिस्थिती उद्भवण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातं. कोरोना काळात अनेक वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी छुप्या पद्धतीनं साठेबाजी केल्यामुळे मोठा साठा बाजारात आलेलाच नाही. तिसरं म्हणजे कोरोनामुळे पर्यटनावर विपरित परिणाम झाला आहे. श्रीलंकेतील मोठा आर्थिक निधी हा पर्यटन व्यवसायातून येत असतो. देशातील परकीय चलनाचा साठादेखील आटल्याचं सांगितलं जात आहे. श्रीलंकेनं नुकतेच 600 पेक्षा अधिक वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम श्रीलंकेतील बाजारपेठांमध्ये दिसू लागला आहे. हे वाचा - Corona Alert : लसीची परिणामकारकता हळूहळू होते कमी, अनेक देशांत तिसरा डोस सुरू महागाईचा कहर श्रीलंकेत वस्तूंचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे महागाई वाढली आहे. देशातील काही भागात साखरेच्या एका किलोचा दर 120 रुपये, काही भागात 190 तर काही भागांत 230 रुपयांवर पोहोचला आहे. श्रीलंका ही दक्षिण आशियातील सर्वात प्रगत अर्थव्यवस्था मानली जाते. या देशाची अर्थव्यवस्था सध्या रुळावरून घसरल्याचं चित्र आहे.
  Published by:desk news
  First published: