मोबाईलचा पासवर्ड दिला नाही; पतीला जिवंत जाळले

मोबाईलचा पासवर्ड दिला नाही; पतीला जिवंत जाळले

मोबाईलचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून संतापलेल्या पत्नीने चक्क पतीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

बाली, 20 जानेवारी: तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक वेळा कौटुंबिक नात्यांमध्ये वाद निर्माण होतो. मोबाईलच्या अति वापरामुळे घटस्फोट झाल्याच्या बातम्या याआधी समोर आल्या आहेत. पण इंडोनेशियामध्ये मोबाईलचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून संतापलेल्या पत्नीने चक्क पतीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार इंडोनेशियातील वेस्ट नुसा तेंगारा प्रांतातील ईस्ट लोम्बाक परिसरात ही घटना घडली. इल्हाम चहयानी ही 25 वर्षीय महिला डेडी पूरनामा या तिच्या पतीसह राहत होती. काही कारणावरून दोघांच्यात सुरु झालेल्या वादातून पत्नीने पतीच्या मोबाईलचा पासवर्ड मागितला. पतीने पासवर्ड देण्यास नकार दिल्याने पत्नीने रागाच्या भरात पेट्रोल टाकून पतीला जाळले.

या घटनेची माहिती कळताच शेजारी मदतीला आले. त्यांनी डेडीला रुग्णालयात दाखल केले, पण त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी इल्हाम हिला अटक केली असून तिची चौकशी सुरु आहे.

दोघांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला होता. पतीने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली. त्यानंतर दोघांच्यात पासवर्डवरून वाद सुरु झाला. हा वाद इतका टोकाला गेला की पत्नीने पेट्रोल टाकून पतीला आग लावली.

VIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस!

First published: January 20, 2019, 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading