मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तानच्या संसदेत राडा; शिवीगाळ करत झाली हाणामारी, महिला खासदार जखमी

पाकिस्तानच्या संसदेत राडा; शिवीगाळ करत झाली हाणामारी, महिला खासदार जखमी

मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेतच (Pakistani Parliament) शिवीगाळ अन् मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या संसदेत झालेल्या या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

इस्लामाबाद 16 जून : मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेतच (Pakistani Parliament) शिवीगाळ अन् मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खादरांनी संसदेतच एकमेकांवर बजेटच्या प्रतीनं हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या संसदेत झालेल्या या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे सत्ताधारी पक्षाचे खासदार अली नवाज खान विरोधी नेत्यांशी भांडणं आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर खासदार व्हिडिओमध्ये प्रश्न-उत्तरांच्या प्रती एकमेकांवर टाकतानाही दिसतात.

हेही वाचा - आता Drone द्वारे घरपोच मिळणार औषधं; 18 जूनपासून सुरू होणार डिलीव्हरी ट्रायल

खासदारांच्या अशा वागण्यामुळे संसदेत भलतीच परिस्थिती निर्माण झाली. हा वाद शांत करण्यासाठी इतर बऱ्याच नेत्यांनी नवाज खान यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तरीन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला होता. मंगळवारी यावर चर्चा होणार होती. याच चर्चेदरम्यान पीटीआयच्या खासदाराने आपले भाषण सुरू केले, त्यानंतर संसदेत गदारोळ झाला.

हेही वाचा - PAN कार्ड हरवलंय? नव्या प्राप्तिकर पोर्टलवरून त्वरित उपलब्ध होईल ई-पॅन

नवाज यांचं भाषण सुरू असतानाच खासदारांमध्ये वाद सुरू झाला आणि नंतर खासदार एकमेकांच्या जवळ येऊन शिवीगाळ करू लागले. यानंतर खासदारांनी एकमेकांवर कागद फेकून हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या संसदेत झालेल्या या घटनेदरम्यान पीटीआयच्या खासदार मालेका बुखारी जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, एकमेकांवर कागदं फेकत असताना याच कागदानं बुखारी यांच्या डोळ्याला जखम झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. विशेष बाब म्हणजे या घटनेदरम्यान पीटीआयचे काही नेते हसतानाही दिसत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता.

First published:

Tags: Pakistan, Parliament session