ब्रिटन, 28 फेब्रुवारी : जेन एटकिन नावाची तरुणी 3 वर्षांपूर्वी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्यासोबत नातं तोडलं आणि याचं कारण म्हणजे ती लठ्ठ होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या मते, ती खूप जंक फूड्स खात होती, ज्यामुळे तिचं वजन वाढलं होतं, ती जाड झाली होती. मात्र तरुणी खचली नाही, तिनं त्याला अशी अद्दल घडवली की तुम्हीदेखील ते पाहून थक्क व्हाल.
जेन एटकिनने सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि थेट मिस ग्रेट ब्रिटनचा किताब जिंकला आहे.
ब्रेकअपनंतर जेन एटकिनच्या हताश झाल्या, मात्र त्यांनी विश्वास गमावला नाही. त्यांच्या आयुष्यावर याचा चांगला परिणाम झाला. त्यांना आपल्या जीवनात बदल केले. फिगर मेंटन करण्यासाठी खूप मेहनत घेतली. फिटनेस, हेल्दी डाएट याकडे लक्ष दिलं आणि अगदी कमी वेळेत त्यांनी स्वतःला फिट बनवलं. इतकंच नव्हे तर सौंदर्य स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला. आधी Miss Scunthorpe आणि त्यानंतर मिस ग्रेट ब्रिटेनचा (Miss Great Britain 2020) किताब त्यांनी जिंकला.
2018 साली त्यांनी पहिल्यांदा मिस इंग्लंड स्पर्धेत सहभागी झाल्या. मात्र त्यावेळी त्यांच्या नशीबानं त्यांना साथ दिली नाही, त्या फक्त रनर अप राहिल्या. त्यानंतर त्यांनी थोडा ब्रेक घेतला आणि पुन्हा मेहनत केली. 75 व्या मिस ग्रेट ब्रिटन स्पर्धेत भाग घेतला आणि 2020 साली किताबावर आपलं नाव कोरलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty, Heavy weight