Home /News /videsh /

फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टरमुळे 14 वेळा फसवणूक; पतीऐवजी स्वत:च्या स्पर्मचा केला वापर

फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टरमुळे 14 वेळा फसवणूक; पतीऐवजी स्वत:च्या स्पर्मचा केला वापर

फर्टिलिटी सेंटरमध्ये पतीच्या स्पर्मचा वापर केला जातो, मात्र या डॉक्टरने केलेला प्रताप पाहून दाम्पत्यांनी संताप व्यक्त केला.

    नवी दिल्ली, 5 जानेवारी : ज्या दाम्पत्यांना मूल होण्यास काही वैद्यकीय अडचणी जाणवतात ते बऱ्याचदा फर्टिलिटी सेंटरकडून मदत घेतात. हे सेंटर अनेकदा अशा दाम्पत्याला आशेचा किरण दाखवतात. त्यामुळे ते डॉक्टरकडे खूप अपेक्षेने जातात. मात्र येथील डॉक्टरने असं काही कृत्य केलं, की ज्यामुळे दाम्पत्यांनी संताप व्यक्त केला. ( 'fertility doctor used own sperm to help Women) या डॉक्टरचं नाव पॉल जोंस असून अनेक वर्षांपासून डॉक्टर हे कृत्य करीत होता. अखेर त्याच्या गुन्ह्याच गूढ समोर आलं. एका टीव्ही शोमध्ये डॉक्टरच्या कृत्याचा खुलासा झाला. डेली स्टारमधील वृत्तानुसार, दोन बहिणींनी या प्रकरणाचा खुलासा केला. त्यांनी एका इंग्रजी न्यूज प्रोग्राम The Truth About My Conception यामध्ये जाहीर केली. या मुलींचे वडील इंमर टेस्टिकुलर कॅन्सरने ग्रस्त आहेत. हे दाम्पत्य मूल जन्माला घालण्यासाठी परिपक्व नव्हतं. 1980 आणि 1985 मध्ये ते आरोपी डॉक्टर पॉलजवळ गेले होते. पॉलने महिलेला न सांगता तिच्या गर्भशयात त्याचा स्वत:चा स्पर्म ट्रान्सफर केला. हे ही वाचा-एकतर्फी प्रेमातून क्रूर कृत्य; अपहरण करत महिलेच्या हातावर लिहिला धक्कादायक मेसेज 2018 मध्ये  Ancestry.com वर कोणीतरी तिच्याशी संपर्क केला. ही एक वेबसाइट असून यात लोक एकमेकांशी संपर्क करतात. यात लोक आपली पिढी, पूर्वज याचा शोध घेतात. या वेबसाइटवर सर्वजण एकमेकांना मेसेज करतात. ज्यात जेनेटिक आधारानुसार एकमेकांचा शोध घेतला जातो. महिलेलादेखील या वेबासाइटच्या माध्यमातून मेसेज आला होता. या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, असं वाटतं की, आपण भाऊ-बहिण आहोत. माझे वडील कोलरडोमध्ये स्पर्म डोनर आहेत. मी माझ्यासारख्या दिसणाऱ्या 3 आणखी भाऊ-बहिणींचा शोध घेतला आहे. असं करीत या दोन्ही बहिणींनी अशा 12 जणांचा शोध लावला. म्हणजे डॉक्टरने 14 वेळा असं कृत्य केलं होतं. या दोन्ही बहिणींना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला. महिलेला तब्बल 38 वर्षांनंतर सत्य कळालं. त्यापूर्वी 2019 मध्येच डॉक्टर जॉन याचा चुकीच्या कामांमुळे मेडिकल परवनाना रद्द करण्यात आला होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Pregnancy, Pregnant woman

    पुढील बातम्या