मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

शिक्षिकेनं विद्यार्थ्याशी ठेवले संबंध, कारमध्येच केले उद्योग; महागड्या उच्चभ्रू शाळेतली घटना

शिक्षिकेनं विद्यार्थ्याशी ठेवले संबंध, कारमध्येच केले उद्योग; महागड्या उच्चभ्रू शाळेतली घटना

ती महिला शिक्षक विद्यार्थ्याला अश्लील साहित्य पाठवत असल्याचं आणि त्याला अनैतिक संबंधांसाठी प्रोत्साहित करत असल्याचं सिद्ध झालंय.

ती महिला शिक्षक विद्यार्थ्याला अश्लील साहित्य पाठवत असल्याचं आणि त्याला अनैतिक संबंधांसाठी प्रोत्साहित करत असल्याचं सिद्ध झालंय.

ती महिला शिक्षक विद्यार्थ्याला अश्लील साहित्य पाठवत असल्याचं आणि त्याला अनैतिक संबंधांसाठी प्रोत्साहित करत असल्याचं सिद्ध झालंय.

  • Published by:  News18 Desk

फ्लोरिडा, 22 सप्टेंबर : एका सुप्रसिद्ध उच्चभ्रू शाळेच्या महिला शिक्षिकेला (Female Teacher) अटक झाली आहे. 38 वर्षीय महिला शिक्षिकेवर तिच्या एका विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध (Sexual Relations) ठेवल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्याच्या मोबाईलवरून अनेक आक्षेपार्ह छायाचित्रं आणि व्हिडिओ सापडलेत.

डेलीच्या वृत्तानुसार, हे प्रकरण अमेरिकेच्या फ्लोरिडामधील एका बोर्डिंग स्कूलमधील आहे. ही शाळा शहरातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. यात शिकणाऱ्या मुलांची वार्षिक फी 60 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका टेलर जे. अँडरसनवर (Taylor J Anderson) शाळेतल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत तिच्या कारमध्ये लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप होता.

विद्यार्थ्यानं घटना घडल्याचं केलं कबूल

शिक्षक-विद्यार्थ्यामध्ये घडलेल्या या अनैतिक संबंधाची परिसरात चर्चा सुरू झाल्यानंतर शाळेच्या प्रशासकांनी पीडित विद्यार्थ्याला विचारणा केली असता जुलैमध्ये हे प्रकरण समोर आलं. यादरम्यान, विद्यार्थ्याने कबूल केलं की शिक्षकानं त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर शाळेनं विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून स्थानिक अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

हे वाचा - वर्क फ्रॉम होम, Cab सर्व्हिस, नाश्ता आणि इन्शुरन्स; ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या देताहेत ‘या’ ऑफर्स; एकदा वाचाच

चौकशी दरम्यान, हे उघड झालं की, दोघांनी जुलैमध्ये प्रथम इन्स्टाग्रामद्वारे एकमेकांशी संपर्क करणं सुरू केलं. यानंतर, स्नॅपचॅट आणि फेसटाइमद्वारे त्यांचं संभाषण सुरू राहिलं. मग ते ऑगस्टच्या सुरुवातीला भेटले आणि ती शिक्षिका विद्यार्थ्याला समुद्रकिनारी घेऊन गेली आणि तिथं त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. या महिला शिक्षिकेनं यापूर्वी सोशल मीडिया साइट्सद्वारे अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असल्याचे दिसून आले आहे.

हे वाचा - कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मिळेल 50 हजारांची भरपाई, केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर

महिलेच्या मोबाइलवर आक्षेपार्ह मजकूर सापडला

पोलिसांनी सोमवारी महिलेला अटक केली. पोलिसांना तिच्या मोबाइलवरून आक्षेपार्ह मजकूर सापडला आहे. यातील छायाचित्रं आणि व्हिडीओवरून ती महिला विद्यार्थ्याला अश्लील साहित्य पाठवत असल्याचं आणि त्याला अनैतिक संबंधांसाठी प्रोत्साहित करत असल्याचं सिद्ध झालंय. व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती अनेक पुरावेही आलेत. दुसरीकडे, शाळेनंही या शिक्षिकेला नोकरीतून काढून टाकलंय.

First published:

Tags: Sexual assault