मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

विद्यार्थ्यांनी Instagram वर पाहिला शिक्षिकेचा अश्लील VIDEO; Viral होताच गेली नोकरी

विद्यार्थ्यांनी Instagram वर पाहिला शिक्षिकेचा अश्लील VIDEO; Viral होताच गेली नोकरी

Viral News: काही शाळकरी मुलांनी सोशल मीडियावर आपल्या शिक्षिकेचे अश्लील व्हिडीओ (students watched female teacher's erotic videos) पाहिले आहेत. इन्स्टाग्रामवर शिक्षिकेचा अश्लील व्हिडीओ पाहून विद्यार्थ्यांसह पालकही हैराण झाले आहे.

  • Published by:  News18 Desk

मॉस्को, 10 डिसेंबर: आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया (Social media) हे काही जणांसाठी मनोरंजनाचं माध्यम बनलं आहे, तर काहींसाठी अपडेट राहण्याचं माध्यम. पण सोशल मीडिया हे अल्पवयीन मुलांसाठी अत्यंत धोकादायक माध्यम आहे. कारण इथे अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या लहान मुलांच्या मनावर कायमस्वरूपी परिणाम करू शकतात. पण अलीकडेच एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये काही शाळकरी मुलांनी सोशल मीडियावर आपल्या शिक्षिकेचे अश्लील व्हिडीओ (students watched female teacher's erotic videos) पाहिले आहेत. इन्स्टाग्रामवर शिक्षिकेचा अश्लील व्हिडीओ पाहून विद्यार्थ्यांसह पालकही हैराण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिक्टोरिया काशिरीना असं संबंधित 23 वर्षीय रशियन शाळेतील शिक्षिकेचं नाव आहे. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला (female teacher's obscene video) आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित महिला शिक्षिका अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप वेगानं व्हायरल झाला असून शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील पाहिला आहे.

हेही वाचा-Interesting! महागड्या हॉटेलात फुकट डेझर्टसाठी नाटक, कपलनं केली Engagement

व्हिक्टोरिया या भाषा विषयाच्या ट्रेनी शिक्षिका आहेत. त्या 11 ते 12 वयोगटातील मुलांना भाषा विषय शिकवायच्या. पण अलीकडेच एका विद्यार्थ्याच्या आईनं इन्स्टाग्रामवर शिक्षिकेचा अश्लील व्हिडीओ पाहिला. त्यांनतर संबंधित महिलेनं शिक्षिकेची तक्रार केली. तिने आपल्या तक्रारीत म्हटलं की,  संबंधित शिक्षिकेनं अश्लील व्हिडीओ पोस्ट करणं थांबवावं किंवा सोशल मीडिया वापरणं बंद करावं. कारण अशा व्हिडीओंचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहे.

या प्रकारानंतर संबंधित शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे. यावेळी व्हिक्टोरिया यांनी म्हटलं की, पालकांनी त्यांच्या व्हिडीओंऐवजी त्यांच्या मुलांचा ब्राउझिंग हिस्ट्री तपासावी. खरंतर संबंधित शिक्षिकेनं गेल्या काही काळात पोल डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. असे व्हिडीओ बनवणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं संबंधित शिक्षिकेनं सांगितलं आहे.

हेही वाचा-जग दिखाव्यावर चालतं, तरुणीनं केलं सिद्ध; पैसे खर्च न करता ‘जगून दाखवलं’!

त्यामुळे मी शिक्षिका असले तरी असे व्हिडीओ बनवणे आणि पोस्ट करणं थांबवणार नसल्याचं तिने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. पण शाळा प्रशासनाला तिची भूमीका पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित घटनेची गांभीर्याने दखल घेत शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकलं आहे. पण या प्रकरणी व्हिक्टोरियाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शाळेच्या या नियमाविरोधात ती खटला दाखल करणार असल्याचंही तिने म्हटलं आहे.

First published:

Tags: Viral news