पत्रकार पतीने क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या पत्नीची केली हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

पत्रकार पतीने क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या पत्नीची केली हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

7 महिन्यांआधी दोघांचं लग्न झालं होतं. पण त्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले आणि नात्यामध्ये वाद सुरू झाला.

  • Share this:

लाहोर, 27 नोव्हेंबर : पाकिस्तानच्या 27 वर्षीय एका महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. नोकरी सोडण्यावरून झालेल्या वादामध्ये पतीने पत्नीची हत्या केली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती स्वत:देखील पत्रकार आहे. 7 महिन्यांआधी दोघांचं लग्न झालं होतं. पण त्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले आणि नात्यामध्ये वाद सुरू झाला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकारी दोस्त मोहम्मद यांनी सांगितले की, उरूज इकबाल या एका उर्दू वृत्तपत्रात काम करत होती. सोमवारी जेव्हा त्या किला गुज्जर सिंह इथे असलेल्या त्यांच्या कार्यालयात प्रवेश करत होती तेव्हा उरूज यांचे पती दिलवार अलीने त्यांच्यावर गोळी झाडली. ही घटना घडताच उरूज यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा भाऊ यासिर इकबाल यांच्या तक्रारीवरून आरोपी पतीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती असली हा एका दुसऱ्या उर्दून वृत्तपत्रात काम करत होता. मृत महिलेल्या भावाने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूज यांचा प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांत त्यांच्या कौटुंबिक वाद सुरू झाले.

या घरगुती वादामुळे पतीने वारंवार उरूज यांना नोकरी सोडण्यासाठी जबरदस्ती करत होता. याच वादामध्ये आरोपी पतीने पत्नीची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून लावण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2019 05:08 PM IST

ताज्या बातम्या