Home /News /videsh /

अफगाणी महिला न्यायाधीशांना जिवाची भीती, शिक्षा सुनावलेल्या सर्व तालिबानी कैद्यांची सुटका

अफगाणी महिला न्यायाधीशांना जिवाची भीती, शिक्षा सुनावलेल्या सर्व तालिबानी कैद्यांची सुटका

अमेरिकेची राजवट असताना महिला न्यायाधीशांनी (Female Judge) शिक्षा सुनावलेले कैदी (Prisoners) आता सत्तापालट झाल्यानंतर सुटले आहेत.

    काबुल, 3 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) राजवट आल्यानंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं (Women atrocities) प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेची राजवट असताना महिला न्यायाधीशांनी (Female Judge) शिक्षा सुनावलेले कैदी (Prisoners) आता सत्तापालट झाल्यानंतर सुटले आहेत. हे कैदी आता बदल्याच्या भावनेने (Revenge) पछाडले असून आपल्याला तुरुंगात पाठवणाऱ्या महिला न्यायाधीशांचा ते शोध घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे महिला न्यायाधीश सध्या चिंतेत आहेत. अनेकांनी सोडला देश महिलांनी न्यायदानाचे काम करणे, ही संकल्पनाच तालिबानला मान्य नाही. त्यामुळे न्यायालयात काम करणाऱ्या सर्व महिलांना तालिबानचा विरोध आहे. त्यात ज्या तालिबानी आरोपींना महिला न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती, त्यांना आता तालिबानची सत्ता आल्यानंतर तुरुंगातून सोडून देण्यात आलं आहे. हे कैदी आता बदल्याच्या भावनेने पछाडले असून महिला न्यायाधीशांचा शोध घेत आहे. ही बाब अगोदरच लक्षात आल्यामुळे काही महिला न्यायाधीशांनी देश सोडला आहे. मात्र बहुतांश न्ययाधीश अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकून पडल्या असून सुटकेचा कुठलाही मार्ग त्यांना दिसत नाही. कैदी घेत आहेत शोध आपला शोध घेत तुरुंगातून सुटलेले काही कैदी आपल्या परिसरात येऊन आपल्याविषयी चौकशी करत होते, अशी माहिती एका महिला न्यायाधीशाने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली आहे. अनेक महिला न्यायाधीश या सध्या आपली ओळख लपवून किंवा ओळख बदलून जगत आहेत. अनेकांनी आपल्या मूळ पत्त्यावरून स्थलांतर केले असून तालिबानी कैद्यांपासून स्वतःचा बचाव करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. हे वाचा - चीनच्या पैशांवर तालिबानच्या सत्तेची कोलांटउडी' तालिबानचं महिलांबाबतचं जुनंच धोरण महिलांनी चार भिंतीआड आणि बुरख्यामध्येच राहावं, हे तालिबानचं धोरण आजही कायम असल्याचं चित्र आहे. महिलांना समान अधिकार देण्याची भाषा तालिबानने केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र सरकारमध्ये एकाही महिलेला तालिबाननं स्थान दिलेलं नाही. त्यामुळे महिलांबाबत जुनंच धोरण तालिबान राबवणार हे जाहीर असून महिलांमध्ये प्रचंड असुरक्षिततेचं वातावरण पसरलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या