मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सुट्टीवरुन परतणाऱ्या महिला कर्मचारीला डिमोट करणं पडलं महागात; बॉसला शिकवला धडा!

सुट्टीवरुन परतणाऱ्या महिला कर्मचारीला डिमोट करणं पडलं महागात; बॉसला शिकवला धडा!

अनेकदा महिलांना अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरं जावं लागतं, मात्र अशा वेळी न घाबरता यावर सवाल उपस्थित करणं गरजेचं असतं.

अनेकदा महिलांना अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरं जावं लागतं, मात्र अशा वेळी न घाबरता यावर सवाल उपस्थित करणं गरजेचं असतं.

अनेकदा महिलांना अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरं जावं लागतं, मात्र अशा वेळी न घाबरता यावर सवाल उपस्थित करणं गरजेचं असतं.

  • Published by:  Meenal Gangurde

ब्रिटेन, 10 डिसेंबर : ब्रिटेनमधील (UK News) एक महिला जेव्हा मॅटरनिटी लिव्हवरुन (Maternity leave) पुन्हा कामावर रुजू झाली, त्यानंतर तिला जबर धक्का बसला. कंपनीने तिचं परफॉमन्स डाऊनग्रेड करून डिमोट (demoted) केलं.

ही महिला गेल्या दोन महिन्यांपासून मॅटरनिटी लिव्हवर होती. कंपनीने महिला सुट्टीवर असलेले दोन महिने जोडून तिच्या कामाचं मूल्यमापन केलं. आणि तिचं थेट डिमोशन केलं. (female employee filed a complaint in the court after being demoted after returning from Maternity leave)

मात्र कंपनीने घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठीच नुकसानकारक ठरला. महिला या विरोधात ट्रिब्युनल कोर्टात गेली. येथे कंपनीचा निर्णय चुकीचा मानण्यात आला. याशिवाय महिलेला नुकसानभरपाई म्हणून 12 लाखांचा निधी (12 lakh as compensation) देण्याचा निर्णय सुनावण्यात आला.

मॅटरनिटी लिव्हवरुन परतली आणि केलं डिमोशन...

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेचा नाव डायना लेडकोवा असून ती लंडनमध्ये एका टेक कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत होती. डायनाने दावा केला आहे की, नोव्हेंबर 2019 मध्ये दोन महिन्याच्या मॅटरनिटी लिव्ह पूर्ण करून कामावर रुजू झाल्यानंतर कंपनीने तिच्यासोबत भेदभावपूर्ण व्यवहार केला. तिच्या सुट्टीतील कामाचं मूल्यांकन करीत तिचं कामही दुसऱ्या पुरुषांना देण्यात आलं.

हे ही वाचा-VIDEO Viral : विद्यार्थिनीचा स्टेजवर सुरू होता डान्स, प्राचार्यांनी उधळल्या नोटा

कोर्टात महिलाच्या पक्षात सुनावला निर्णय...

डायना हिने तिच्या जॉब परफॉमन्स रेटिंगविरोधात ट्रिब्युनल कोर्टात धाव घेतली. यापूर्वीच्या परफॉमन्समध्ये महिलेला टॉप रेटिंग मिळाली होती. मात्र मॅटरनिटी लिव्हमुळे तिला डिमोट करण्यात आलं. यानंतर कोर्टाने हा व्यवहार भेदभावपूर्ण असल्याचं मानून कंपनीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कंपनीने डायनाला 12 लाख रुपये द्यावे असं ठरवण्यात आलं.

First published:

Tags: England